पिंपळवंडी या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा सापडला मृतदेह

पिंपळवंडी -ता.१८( वार्ताहर )पिंपळवंडी ( ता जुन्नर ) येथील ओढ्याच्या कडेला मंगळवारी ( दि 9) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दहा वर्षाच्या एका अल्पवयिन मुलीचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपळवंडी (ता. जुन्नर )येथील एक लहान मुलगी मंगळवारी दुपारी चार नंतर बेपत्ता झाली असल्याची तक्रार आळेफाटा पोलिस स्टेशन मध्ये मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती
त्यानंतर आळेफाटा पोलीसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर अल्पवयीन मुलीचा शोध तपास चालू केला असता रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सदर अल्पवयीन मुलीचा मृतदेह लेंडे स्थळ या ठिकाणी असलेल्या ओढ्याच्या कडेला झाडाजवळ आढळुन आला असुन सदर मुलीचा घातपात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे याप्रकरणी एका संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास जुन्नरचे उप विभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी तपास करत आहेत

