जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अशोक खरात तर सचिवपदी सचिन कांकरिया यांची निवड

नारायणगाव -(प्रतिनिधी) जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे बातमीदार अशोक खरात यांची तर सचिवपदी सचिन कांकरिया यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषद, मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न असलेल्या जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची सन २०२६ साठी नूतन कार्यकारिणीची नारायणगाव येथे झालेल्या वार्षिक सभेत निवड करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष मीनानाथ पानसरे होते.कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अशोक खरात (अध्यक्ष), सचिन कांकरिया (सचिव), प्रवीण फल्ले, दिनकर आहेर (उपाध्यक्ष), धर्मेंद्र कोरे (कार्याध्यक्ष), अर्जुन शिंदे (सहसचिव), विजय लोखंडे (खजिनदार), महेश घोलप (सहखजिनदार), सुरेश भुजबळ (जिल्हा निमंत्रक), दादा रोकडे (तक्रार निवारण समिती अध्यक्ष), मीनानाथ पानसरे (जुन्नर विभाग प्रमुख), अमर भागवत (नारायणगाव विभाग प्रमुख), विजय देशपांडे (आळेफाटा विभाग प्रमुख), ॲड.संजय शेटे (ओतूर विभाग प्रमुख).
सदस्य : राजेश कणसे, गोकुळ कुरकुटे, अशोक डेरे, विजय चाळक, अतुल कांकरिया, मंगेश पाटे, रवींद्र कोल्हे, हितेंद्र गांधी, अमोल गायकवाड , प्रवीण ताजने, दुष्यंत बनकर, वसंत शिंदे, अण्णा लोणकर.
सल्लागार : रवींद्र पाटे, नितीन गाजरे, नितीन ससाणे, आनंद कांबळे, लक्ष्मण शेरकर, ज्ञानेश्वर भागवत.
कायदेविषयक सल्लागार : ॲड. यू. सी.तांबे, ॲड.रवींद्र देवकर, ॲड.भूषण शेटे, ॲड. अनिकेत भुजबळ.
२०२६ च्या कार्यकाळात पत्रकार संघ आणि पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक खरात यांनी यावेळी व्यक्त केला.



