ताज्या घडामोडी

शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे : प्रा.मोबीन तांबोळी :समर्थच्याजेष्ठ नागरिक शिबिराला १३६७ जेष्टांची उपस्थिती

राजुरी ( दि 14) प्रतिनिधी)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (बहि:शाल विभाग) व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा नुकतीच राजुरी येथे संपन्न झाली.यावेळी तब्बल १३६७ जेष्ठ नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून प्रा.मोबीन तांबोळी,प्रा.नीलिमा फोकमारे,प्रा.पुरुषोत्तम काळे प्रा.डॉ.रुस्तुम दराडे,प्रा.अनिल काळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत बोलताना प्रा.तांबोळी म्हणाले की,ज्येष्ठ नागरिकांनी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे.बदलत्या सामाजिक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन,सतत शिकण्याची तयारी आणि सामाजिक सहभाग यामुळे जीवन अधिक आनंदी व अर्थपूर्ण बनते.
यावेळी त्यांनी आरोग्य व्यवस्थापन,दैनंदिन जीवनातील ताणतणाव,आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर तसेच समाजातील सक्रिय सहभाग याबाबत उपयुक्त माहिती दिली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके ,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप प्रा.गणेश बोरचटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी केले तर बहि:शाल विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा.आशिया चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!