नांदी फाउंडेशन नन्ही कली सक्षमीकरण उपक्रमांतर्गत येडेश्वर विद्यालय येडगाव मध्ये शालेय साहित्य वाटप : विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

येडगाव ( प्रतिनिधी)महिंद्रा अँड महिंद्रा सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असलेल्या नांदी फाउंडेशन यांच्या वतीने राबविण्यात येणारा नन्ही कली सक्षमीकरण हा उपक्रम येडेश्वर विद्यालय येडगाव येथे सातत्याने व प्रभावीपणे राबविल्या जात असून या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाला चालना देणे त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवणे व आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026रोजी या उपक्रमांतर्गत विद्यालयातील विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .टी-शर्ट ,सॉक्स शूज ,वही पेन व इतर शैक्षणिक साहित्य संच यांसारख्या उपयुक्त वस्तू विद्यार्थिनींना देऊन त्यांना दैनंदिन शिक्षणातील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वाटपामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंद उत्साह आणि अभ्यासाबाबत नवी उमेद निर्माण होण्यास मदत होणार आहे .याप्रसंगी प्रशिक्षक कल्याणी मॅडम, व विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक काकडे सर ,व सर्वच शिक्षक वृंद उपस्थित होते.



