खोडद येथील संजीवनी डोंगरे यांचा“मास्तरांची सावली ” पुरस्काराने सन्मान

खोडद -( प्रतिनिधी) पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने आयोजित काव्यजागर संमेलनात खोडद ( ता. जुन्नर) येथील संजीवनी जालिंदर डोंगरे यांचा मास्तरांची सावली या गौरवशाली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खोडद येथील सामाजिक कवी व सामाजिक कार्यकर्ते जालिंदर डोंगरे हे गेली चार दशके सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. त्याच्यामध्ये शिक्षण असेल,मराठी साहि
त्य चळवळ,सामूहिक विवाह,व्यसनमुक्ती, वैद्यकीय शिबिरे, व्याख्याने जी एम आर टी प्रकल्पाची स्थानिक नोकरभरती आंदोलन महागाईच्या विरोधात सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात आंदोलन इत्यादी क्षेत्रांमध्ये अविरतपणे कार्य करीत आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी संजीवनी यांनी प्रपंचाची धुरा समर्थपणे सांभाळली.त्यांनी अपार कस्टामधून गरिबीतला फाटका प्रपंच अतिशय नेटाने केला. जालिंदर डोंगरे यांना या प्रपंचाकडे बऱ्याच वेळा पाहता येत नसे. अशावेळी मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण व त्यांच्यावर संस्कार करणे इत्यादी गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्या. कशाचीही अपेक्षा केली नाही. कष्टामध्येच त्यांनी राम शोधला. कष्टाशी नेहमी प्रामाणिक राहिल्या याचा विचार करून, उपरोक्त संस्थेने एकोण नव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते व जेष्ठ कवी विट्टल वाघ यांच्या प्रमुख उपस्तीथी मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले
या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समरसता पुनरुत्थान गुरुकुलमचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.संभाजी मलगे कवी संदीप वाघुले बाजीराव सातपुते, पुरुषोत्तम सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते.



