येडगाव येथील येडेश्वर विद्यालयाने साधला त्रिवेणी संगम

येडगाव -( प्रतिनिधी) येडेश्वर विद्या मंदिर येडगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, या विद्यालयात राजमाता जिजाऊ ,स्वामी विवेकानंद,यांच्या जयंती निमित्त
व स्व,लालबहादूर शास्त्री यांच्या
पुण्यतिथीचे औचित्य साधून राजमाता जिजाऊंचा जीवनप्रवास उलगडताना हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ज्ञान चातुर्य पराक्रम चारित्र्य अशा अनेक संस्कारांचे बाळकडू शिवन्या मिळाले अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची बळ राजमातांनी दिले आपल्या स्वराज्याच्या स्वप्नातून महाराष्ट्रात एक नवी सृष्टी निर्माण केली म्हणूनच इतिहास घडविणारी एक स्वराज्य प्रेरक महिला म्हणून राजमातांचे स्थान उच्च दर्जाचे राहिले स्वराज्याच्या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या राष्ट्रमाताच नव्हत्या तर त्या वीर कन्या वीर पत्नी धीरोदात्त राजमाता होत्या शस्त्र शास्त्र पारंगत राज्यकारभार कुशल होत्या म्हणूनच 18 पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य उभारले जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभूछावा आणि शंभूछावा असे विचार विद्यार्थी मनोगतात मांडले गेले तसेच भारत देशाचे महान विचारवंत व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मनोगत व्यक्त करताना महान बुद्धिवंत निर्भय व आत्मविश्वासू व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद होत शिकागो येथे जागतिक परिषदेत आपल्या प्रभावी भाषणे जगाला भारताची संस्कृती पटवून देऊन धर्म परिषद जिंकणारा एक महान योद्धाच स्वामी विवेकानंद होत उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांचा जगाला मार्गदर्शक ठरतो मेहनत शिस्त चारित्र्य आणि राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व समजावणारा हा महान विचारवंत होय व भारत देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले प्रसंगी सर्वच शिक्षक व विद्यार्थी यांचे समवेत जयंती व पुण्यतिथी असा त्रिवेणी संगम साधून सर्वच राष्ट्रपुरुषांना कोटी कोटी प्रणाम विद्यालयाच्या वतीने करण्यात आला



