ताज्या घडामोडी

पिंपळवंडीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी

पिंपळवंडी -( प्रतिनिधी )
चौदावी पामा इंडिया अबॅकस आणि मेंटल अरिदमॅटिक राष्ट्रीय स्पर्धा २०२६ ही शिर्डी येथे यशस्वीरित्या पार पडली. देशभरातून सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या स्पर्धेला भव्य स्वरूप प्राप्त झाले. या प्रतिष्ठित स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथमच सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केले
येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पामा इंडिया या
संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेला अबॅकस प्रशिक्षण उपक्रम अत्यंत यशस्वी ठरत असून, त्याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामध्ये दिसून आला आहे
या स्पर्धेत रीदा इम्रान तांबोळी (चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेती ) अद्विता पंकज भोर व अख्तर इम्रान तांबोळी
( चॅम्पियन विजेते) द्वितीय क्रमांक – काव्या सुहास कसबे
रितू प्रदीप वामन व रुद्रांश सुनील रायकर तृतीय क्रमांक:
रुषिका आशीष वामन व विधी मंगेश मंडलीक
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अक्षरशिल्प पामा इंडिया, मार्गदर्शक शिक्षिका श्वेता दांगट जया गोरडे मनीषा भुजबळ माणिक बोऱ्हाडे श्रीकांत भालेराव पिंपळवंडी ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले
“योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करू शकतात,” याचा प्रत्यय पिंपळवंडीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून दिला आहे.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!