ताज्या घडामोडी

आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील सहा आरोपींना अटक :स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशन,यांची कारवाई

ओतूर ( प्रतिनिधी ) ओतूर पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील सहा आरोपींना अटक करून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस व इतर हत्यारांसह ₹१४,८७,८२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त; गंभीर स्वरूपाचे एकूण १९ गुन्हे उघड करण्यात आले आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशन,यांच्या वतीने करण्यात आली या कामी स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशन,यांच्या वतीने करण्यात आली आलमे बल्लाळवाडी कोळवाडी डिंगोरे ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले
लोणी प्रवरा, जि. अहिल्यानगर येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप क्र. MH-17-AJ-3075 ही ओतूर पोलीस ठाणे हद्दीत दि. 12/07/2026 रोजी सकाळी 09:00 वा. कोळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे दिसून आली. सदर वाहनाचा शोध वाहन मालकाचे नातेवाईक विघ्नेश सुभाष घोलप हे घेत असताना त्यांनी वाहनासह असलेल्या संशयित इसमांना विचारणा केली असता त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी विघ्नेश घोलप यांनी “चोर-चोर” अशी आरडाओरड केल्याने गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर गावकरी व आरोपी यांच्यात झटापट होऊन दोन आरोपींना गावकऱ्यांनी पकडले, तर इतर चार आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशनच्या पथकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा पाठलाग केला. आलमे गावच्या डोंगर-दरी परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या घटनेप्रकरणी ओतूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 196/2026 अन्वये भा.न्या.सं. कलम 310(4), 310(5), आर्म्स अॅक्ट कलम 3, 4, 25 व म.पो.का.क. 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय पाटील, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि महादेव शेलार, तसेच पोसई युवराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आला. सुमारे ६ तास डोंगर-दरी परिसरात शोधमोहीम राबवून स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांच्या मदतीने पळून गेलेल्या चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपी:
1) सोनूसिंग कापूरसिंग टाक, वय 30 वर्षे, रा. तुळजाभवानी वसाहत, कॅनॉलजवळ, हडपसर, पुणे.
2) जिलूसिंग शेरसिंग दुधानी, वय 40 वर्षे, रा. सह्याद्री हॉस्पिटलचे मागे, खोपोली, शिळफाटा, जि. रायगड.
3) करणसिंग गगनसिंग टाक, वय 27 वर्षे, रा. साकला प्लॉट, परभणी.
4) पंकजसिंग काळुसिंग शिकलगार उर्फ दुधानी, वय 40 वर्षे, रा. गांधीनगर झोपडपट्टी, अंबरनाथ.
5) पापीसिंग उर्फ कृष्णसिंग साहेबसिंग टाक, वय 18 वर्षे, रा. साकला प्लॉट, परभणी.
6) मंगलसिंग मायासिंग दुधानी, वय 58 वर्षे, रा. झरी, जि. परभणी.
नमूद आरोपी हे सराईत असल्याने त्यांचेकडे चौकशी करून तपास केला असता, त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

१ ओतूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण १९६/२०२६, भा.न्या.सं. कलम ३१०(४), ३१०(५), ३(५), सह आर्म्स अॅक्ट कलम ३, ४ (२५), सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५(२)
2) संगमनेर पोलीस स्टेशन, जि. अहिल्यानगर ६७६/२०२६, भा.न्या.सं. कलम ३१०(२)
३) नेवासा पोलीस स्टेशन, जि. अहिल्यानगर ६०७/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०९, ३३१(४)
४) लोणी प्रवरा पोलीस स्टेशन, जि. अहिल्यानगर ३४८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(३)
५) अंबेजोगाई पोलीस स्टेशन, जि. बीड २९५/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२)
६) निजामाबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा २०२/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०९(४)
७) माकलूर पोलीस स्टेशन, तेलंगणा
७०१/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०९(४)
८) निर्मल पोलीस स्टेशन, तेलंगणा
३६२/२०२६, भा.न्या.सं. कलम ३१०(२)
९) आरमूर पोलीस स्टेशन, तेलंगणा
३८०/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०९
१०) आरमूर पोलीस स्टेशन, तेलंगणा ३८१/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०९
११) आरमूर पोलीस स्टेशन, तेलंगणा ३८३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०९
१२) निजामाबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा
१२७/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०९
१३) निजामाबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा
७७१/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०९(ब)
१४) निजामाबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा ७७२/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०९(ब)
१५) निजामाबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा
७७३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०९(ब)
१६) निजामाबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा ७७४/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०९
१७) निजामाबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा७७६/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०९
18) नेवासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 604/2026 BNS 331(4), 305(b)
19) नेवासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 605/2026 BNS 324(4), 62

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी असे एकूण १९ गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये १२ दरोडे, १ दरोड्याचा प्रयत्न, २ जबरी चोरी, ११ घरफोडी, २ वाहन चोरी व खाजगी मालमत्ता नुकसान 1या गुन्ह्यांचा समावेश आहे.
सदर आरोपींवर यापूर्वी महाराष्ट्रासह तेलंगणा व इतर राज्यांमध्ये ५० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना मा. न्यायालयात पोलीस कोठडी रिमांड मिळण्यासाठी हजर करण्यात आले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल सा. अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, पुणे विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग श्री धनंजय पाटील, श्री प्रमोद क्षीरसागर, पो.नि. स्थानिक गन्हे शाखा, श्री दत्तात्रय गुंड पो.नि.जुन्नर पो.स्टे., महादेव शेलार , स.पो.नि. स्था.गु.शा. ज्ञानेश्वर बाजगिरे स.पो.नि. ओतुर पोलीस स्टेशन, युवराज जाधव पोसई ओतूर पोलीस स्टेशन, पेालीस अंमलदार ‘ आनंदा भवारी बाळशिराम भवारी .धनंजय पालवे, सुरेश गेंगजे, दिनेश साबळे, नामदेव कांबळे, नरेंद्र गोराने, देविदास खेडकर, दिपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, मपोहवा संगीता मधे .रेश्मा फापाळे, पोशि मनोज राटोड .रोहित बोंबले . ज्योतीराम पवार, सुभाष केदारी, विशाल गोडसे, योगेश उकिरडे, मपोशी काळे, त्याचप्रमाणे जुन्नर आर. सी. पी पथक यांनी केली आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी आलमे गावच्या डोंगर परिसरात राबविण्यात आलेल्य शोधमोहीमेत बल्लाळवाडी, आलमे, कोळवाडी,डिंगोरे येथील नागरिक व पोलीस पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!