कुकडी डाव्या कालव्यात पडलेल्या दामपत्याचा लागला शोध : चाळीस तासानंतर सापडले मृतदेह
पिंपळवंडी – ( प्रतिनिधी ) येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पडून उंब्रज येथील अक्षय यशवंत शिंगोटे ( वय 28 वर्ष ) व प्राजक्ता अक्षय शिंगोटे ( वय 25 वर्ष ) या
दामपत्याचा मृत्यू झाला असल्याची घटना सोमवारी ( दि.30) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती त्यानंतर तब्बल चाळीस तासानंतर बुधवारी ( दि 1) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या दोघांचेही मृतदेह लेंडेस्थळ येथे सापडले
काळवाडीकडे जाणाऱ्या कालव्याच्या पुलाजवळ सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्याच्या रस्त्याने काही नागरिक जात होते त्यावेळी एक लहान बालक कालव्याच्या कडेला त्याच्या आई व वडिलांना रडत हाका मारत असल्याचे दिसून आले त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी बाळकाजवळ जाऊन पहिले असता त्यांना त्या ठिकाणी चप्पल आढळून आली त्यावेळी कालव्याकडे लक्ष गेले असता ते दाम्पत्य कुकडी डाव्या कालव्याच्या पाण्यात वाहून जाताना दिसलें त्यानंतर या घटनेची माहिती आळेफाटा पोलिसांना कळविण्यात आली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर पर्यंत शोध घेतला मात्र शोध लागला नाही त्यानंतर
बोटीच्या सहाय्याने या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र कालव्या मधील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या अखेर उंब्रज व काळवाडी गावचे सरपंच हिरामण हांडे व तुषार वामन उंब्रज गावाचे पोलीस पाटील राहुल हांडे आणि दोन्हीही गावच्या ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कालव्या मधील पाणी कमी करण्याची मागणी केली मात्र त्यांनी पाणी कमी करण्यास असमर्थथा दाखविली याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याकडूनही पत्र देण्यात आले होते ग्रामस्थ व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यामध्ये शाब्दिक चकमक झाली ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर सकाळी अधिकाऱ्यांनी पाणी बंद केले व त्यानंतर जुन्नर येथील दहा जणांच्या शिवनेरी रेस्क्यू टीमच्या मदतीने पुन्हा त्यांचा शोध घेण्यात आला ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाण्यापासून साधारणता दीड किलोमीटर अंतरावर लेंडेस्थळ येथे दोन्हीही मृतदेह सापडले त्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव आळेफाटा पोलीस स्टेशनंचे कर्मचारी व पोलीस पाटील राहुल हांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत



