विश्वकर्मा पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न : सभासदांना अकरा टक्के लाभांश

आळेफाटा – ( प्रतिनिधी ) आळेफाटा ( ता जुन्नर ) येथील विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली
पतसंस्थेचे अध्यक्ष रामदास भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विषय पत्रिकेवरील एकूण अकरा विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी सभासदांनी
विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या सभेला पतसंस्थेचे उपाध्यक्ष हरिदास ताजवे संचालक शिवप्रसाद दिवेकर बंडोपंत ताजवे रामदास राऊत जयहिंद भूतांबारे संजय जाधव प्रा. डॉ. अनुराधा ताजवे विठ्ठलशेठ गुंजाळ नितीनशेठ भद्रीगे मोहन जाधव शरद ताजवे शारदा भालेराव बेबीताई ताजवे सल्लागार एस बी वाकचौरे किसन जाधव विठ्ठलशेठ जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी विलास डावखर रवींद्र वाव्हळ महेंद्र नरवडे सुनिलशेठ जाधव ऍड. निवृत्ती घोडके रोहित जाधव प्रभाकर दिवेकर जयशिंग वाकचौरे पांडुरंगशेठ वाकचौरे उपस्थित होते

यावेळी पतसंस्थेच्या आर्थिक प्रगती विषयी माहिती देताना पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधीकारी विलास डावखर यांनी सांगितले की पतसंस्थेचे नऊशे चौपन्न सभासद असून अधिकृत भागभांडवल एक कोटी रुपये असून 9 कोटी 65 लाख 89 हजार 326 रुपयांच्या ठेवी आहेत 2कोटी 34लाख 63हजार 716 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे संस्थेला 13लाख 91हजार 31रुपये नफा झाला असून सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे डावखर यांनी सांगितले
यावेळी पतसंस्थेचे सभासद असलेल्या मान्यवरांची विविध ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्यांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला

