ताज्या घडामोडी

कालेकरवाडी येथील महिलांच्या  लेझीम पथकाने जिंकली उपस्थितांची मने 

पिंपळवंडी -( दि ४) प्रतिनिधी

कालेकरवाडी ( पिंपळवंडी)  येथील नवतरुण गणेश मंडळाचा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा  ध्वनिप्रदूषण विरहीत अत्यंत दिमाखात संपन्न झाला या विसर्जन मिरवणूक सोहळ्यात येथील महिलांनी लेझीम खेळत ठेका धरला  नेहमीच सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक तसेच नवरात्रात कमलादेवीचा जागर व आरती कार्यात हिरीरीने सहभागी होत असलेल्या महिलांनी यावर्षी प्रथमच श्री कमलादेवी महीला लेझीम पथक स्थापन करुन त्यांच्या लेझीम नृत्याने श्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली.पिंपळवंडी ग्राम प्रवेश द्वारावर कालेकरवाडी  ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष. श्री तुकाराम येंधे यांनी महीला, नवतरुण वर्ग व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून महीला लेझीम पथकाचे उद्घाटन केले. हे लेझीम नृत्य कोणतेही ध्वनिप्रदूषण विरहीत ढोल या वाद्यावर सादर केले.सौ.अकांशा कालेकर व कु.अंकिता कालेकर यांनी या लेझीम पथकाला मार्गदर्शन केले.या  लेझीम पथका मध्ये रेखा कालेकर,प्रतिक्षा कालेकर,वंदना कालेकर,रेखा येंधे,शितल कालेकर,निलम कालेकर,अश्विनी कालेकर, शितल कालेकर,निलम कालेकर, कु.स्वराली , कोमल , पल्लवी पुर्णीमा,शैला,तनु, सान्वी ,सायली यांचा लेझीम नृत्या मध्ये सहभाग होता.

या प्रसंगी नवतरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री विशाल कालेकर,सर्वश्री नंदाराम कालेकर, बाळासाहेब कालेकर, प्रविण कालेकर,रभाजी येंधे, मारुती कालेकर,अनिल कालेकर,अशोक कालेकर,अरूण कालेकर,गुलाब कालेकर, माऊली  कालेकर,शांताराम कालेकर,नारायण घुले, चंद्रकांत येंधे, संदिप कालेकर मयूर येंधे कोंडीभाऊ कालेकर ,किसन कालेकर, सुभाष कालेकर, सुरेश कालेकर, स्वामी कालेकर तरुणांमध्ये वैभव कालेकर,अरविंद कालेकर ,जयेश येंधे, विनोद कालेकर,अनुराज, किशोर येंधे, संदिप कालेकर,मयुर कालेकर, रोहीत कालेकर,अथर्व कालेकर,सागर कालेकर,दिपक कालेकर,मंगेश येंधे,अजय कालेकर,आकाश कालेकर ओंकार कालेकर सुनिल कालेकर वरद येंधे,व अनेक नवतरूण व महिला यांची उपस्थिती होती.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!