ताज्या घडामोडी
पिंपळवंडीत भर दिवसा पुन्हा बिबट्याचा हल्ला : चार दिवसांमध्ये घडली तिसरी घटना
पिंपळवंडी -( दि ९) प्रतिनिधी
काळवाडी ( ता जुन्नर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाच्या बालकाचा म्रुत्यू झाला होता या घटनेला चोबीस तास होत नाही तोच पुन्हा पिंपळवंडी येथील काकडपट्टा शिवारात आज गुरूवारी ( दि ९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केला यावेळी शेतकऱ्याने धाडस दाखवत जखमी वासराची बिबट्याच्या तावडीमधुन सुटका केली गेल्या चार दिवसात बिबट्याने हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे यामुळे परिसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण अजूनही कायम आहे
येथील शेतकरी श्रीकांत तान्हाजी काकडे यांच्या घराच्या बाजूलाच जनावरांचा गोठा आहे या गोठ्यामधील वासरु बाजूला असलेल्या शेताच्या बांधावर गवत खात होते त्यावेळी बाजूच्या गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक वासरावर हल्ला केला त्यावेळी बाजूच्या शेतात श्रीकांत आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य शेतात काम करत होते त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पंचवीस ते तीस माणसांचा जमाव जमा झाला व त्यांनी बिबट्याला हुसकावत या वासराची बिबट्याच्या तावडीमधुन सुटका केली त्यानंतर हा बिबट्या पुन्हा त्याच गवताच्या शेतात जाऊन दबा धरून बसला होता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीही बिबट्याला समक्ष पाहिले दोन तासांनी हा बिबट्या पुन्हा बाहेर आला व त्याने तेथून पळ काढला या घटनेची दखल घेत वनखात्याने त्या ठिकाणी पिंजरा लावण्याचा निर्णय घेतला असून त्या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनरक्षक संतोष साळूंके यांनी सांगीतले
पिंपळवंडी व काळवाडी परिसरात गेल्या चार दिवसात बिबट्याने तिन हल्ले केले आहेत त्यामुळे बिबट्यांचा उपद्रव वनखात्याची व नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे




