पिंपरीपेंढार -( दि १०) पिंपरीपेंढार येथील गाजरपट शिवारात महिलेवर हल्ला करणारे दोन बिबटे जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे
पिंपळवंडी काळवाडी व पिंपरीपेंढार परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता बिबट्याने लेंडेस्थळ येथील एक महिलेवर हल्ला करुन जखमी केले आहे तर काळवाडी येथे एक आठ वर्षाचा बालक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता या दोन्हीही घटना ताज्या असतानाच आज शुक्रवारी ( दि १०) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पिंपरीपेंढार येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले होते या घटनांनंतर वनखात्याने लेंडेस्थळ काळवाडी व पिंपरीपेंढार या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते आज शुक्रवारी सकाळी लेंडेस्थळ या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला तर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पिंपरीपेंढार या ठिकाणी घटनास्थळी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला तर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे दिवसभरात एकूण तिन बिबटे जेरबंद झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे