ताज्या घडामोडी

पिंपळवंडी येथे बिबट्याचा ऊस तोडणी करणाऱ्या  तरुणीवर हल्ला 

पिंपळवंडी ( दि २३) प्रतिनिधी

  पिंपळवंडी (ता जुन्नर) येथील तोतरबेट शिवारात एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना एका 18 वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला केल्याने ऊसतोडणी तरूणी जखमी झाली असल्याची घटना मंगळवारी ( दि २३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली
याबाबत ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिलेली माहिती अशी की येथील सूर्यकांत सखाराम तोतरे यांच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती उसाच्या शेतात असलेले शेतमजूर तोडलेल्या ऊसाच्या मोळ्या गाडीमध्ये भरत असताना साडेसहा वाजेच्या दरम्यान ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या   बिबट्याने रितू श्यामराव गांगुर्डे (वय 18 मुळ रा चाळीसगाव) या तरुणीवर अचानक हल्ला केला.  यावेळी तेथे असलेल्या ऊस तोडणी मजुरांनी आरडाओरडा करत हातात कोयता व ऊस घेत रितुकडे धाव घेतली  यावेळी  जखमी अवस्थेत असलेल्या  रितू गांगुर्डे हिनेही आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.
  दरम्यान यावेळी बिबट्याच्या पंजाच्या नख्यांनी रितु गांगुर्डे हिच्या डोक्यावर, खांद्यावर व पाठीवर जखमा झाल्या. यानंतर तातडीने रितु हिस उपचारासाठी पिंपरीपेंढार येथील दवाखान्यात
 नेत असल्याची माहिती ऊसतोड मजुरांनी वनविभागास दिली माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी तातडीने घटनास्थळी आळे वनपरिक्षेत्रेचे वनपाल संतोष साळुंखे वनसेवक बी के खर्गे, रोशन नवले तातडीने घटनास्थळी पाठवले. त्यांनी तात्काळ रितु हीस नारायणगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  पिंपळवंडी परिसरात ऊसाचे मोठे क्षेत्र असून या परिसरात बिबट्याचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. पिंपळवंडी येथे महिन्यापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यातून एक तरुण प्रसंगावधान दाखवल्याने बचावला होता. तसेच या परिसरात पशुधन व पाळीव प्राणी ठार होत असल्याच्या घटनाही घडत आहेत. तोतरबेट परिसरात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!