ताज्या घडामोडी
चाळकवाडी टोलनाक्याजवळ दोन वाहनांचा विचित्र अपघात : एकजण जागीच ठार

पिंपळवंडी -( दि २३) प्रतिनिधी
पुणे नाशिक महामार्गावर चाळकवाडी ( ता जुन्नर) टोलनाक्याजवळ मालवाहू कंटेनर व मालवाहू ट्रेलर यांच्या झालेल्या अपघातात ट्रेलर चालक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार (दि 23) रोजी सकाळी सव्वा सात वाजता घडली.
आशिष सुखलाल पटेल (रा गंभीरा, कटरा ता जठवरा जि प्रतापगड उत्तर प्रदेश) असे या अपघातात ठार झालेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बाजूने नाशिक बाजूकडे जात असलेला ट्रेलर (क्रमांक एम एच 15 सी के 2396) हा चाळकवाडी टोलनाक्याचे अलिकडे स्पीडब्रेकर थांबला असता. त्यावरील चालक अशीच पटेल या ट्रेलरचे केबिनमधून उतरून दरवाजा लावत असताना पाठीमागून पुणे बाजूने नाशिक बाजूकडे जाणारा मालवाहू कंटेनर (क्रमांक आर जे 14 जी पी 3077) यावरील चालकाने रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने चालवून ट्रेलरचे केबिनला घासून दरवाजा लावत असलेल्या आशिष पटेल याला धडक देवून पुढे गेला. अपघातात आशिष पटेल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरुन कंटेनर चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय शिंगाडे पुढील तपास करत आहे.



