ताज्या घडामोडी

आळे येथे महावितरण कंपणीच्या ट्रान्सफार्मरमधील  काॅईलची चोरी 

आळेफाटा  -( दि २२) प्रतिनिधी

आळे येथील कैचनमळा शिवारात असलेल्या महावितरण कंपणीच्या ट्रान्सफार्मरमधील दहा हजार रुपये किमतीची विजेची काॅ ईल चोरीला गेली असल्याची घटना शनिवारी ( दि २०) उघडकीस आली
याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बुधवारी ( दि १०) दुपारी साडेतीन ते गुरुवारी ( दि. ११) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान आळे गावच्या हद्दीत असलेल्या  कैचनमळा येथील महादेव मंदीर. पिंपळगावजोगा  कालव्याशेजारी असणाऱ्या इलेक्ट्रीकल ट्रान्सफॉमर मधील बारा किलो वजनाची सुमारे दहा हजार रुपये किमतीची असणारी कॉपरची कॉईल ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली याबाबतची फिर्याद
महावितरण कंपणीचे कर्मचारी संदीप सुखदेव नांगरे ( वय 39 वर्षे रा आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे ) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षण सतिष होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एन टी गायकवाड करत आहेत
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!