ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांचे सोयाबिन व गहू चोरणारी टोळी जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

जुन्नर -( दि २१) प्रतिनिधी

जुन्नर परिसरात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच गहू चोरणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून
तब्बल ५ टन ६५० किलो वजनाचे ११३ सोयाबीन कट्टे व ८ गव्हाच्या कट्ट्यासह ८,७९,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की  जुन्नर  पोलीस स्टेशन गु.र.नं १०५/२०२४ भादवि कलम ४५७,३८० नुसार गुन्हा दाखल होता.फिर्यादी नामे गणेश केदार  रा.घोडेगाव फाटा ,जुन्नर यांनी फिर्याद दिली की दि.२४/३/२०२४ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वडगाव साहणी येथील फार्महाऊस मधून सोयाबीनचे ३५ कट्टे चोरून नेले आहेत.
         अशाच प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण जुन्नर परिसरामध्ये वाढले होते.सदर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखे मार्फत तपास करत असताना विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासले असता सदर चोऱ्या ह्या एकच टोळी करत असून गुन्ह्यात वापरलेल्या पिकअपचा CCTV मार्फत मागोवा घेतला असता सदर पिकअप निमदरी ता. जुन्नर या भागातील असल्याचे समजले. मिळालेल्या माहिती नुसार निमदरी परिसरात गोपनीय बतमीदारमार्फत माहिती घेतली असता सदर गुन्हे हे निलेश केवळ, साईनाथ केवळ यांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीने केल्याचे समजले.
      मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सदर इसम हे त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन सोयाबीन विक्री करणेसाठी घोडेगाव फाटा येथे येणार आहेत. सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पिकअप सह संशयित इसम नामे *१)निलेश लक्षण केवळ वय-२४ २)साईनाथ विलास केवळ वय २१ ३)रवींद्र गोरक्ष केवळ वय.२३ वर्ष ४)राजेंद्र रामदास केवळ वय.२६ सर्व राहणार निमदरी ता. जुन्नर ५)सुनील मोहन काळे वय.२६  ६)रविराज विजय मोधे वय.२४ दोघे  रा. कुसुर,तलाखी ता. जुन्नर*  यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जुन्नर परिसरामध्ये सोयाबीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. *त्यांच्या ताब्यातून एकूण ५६५०किलो सोयाबीन चे एकूण ११३ कट्टे तसेच ४८० किलो वजनाचे गव्हाचे ८ कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी असा एकूण ८,७९,९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.* सदर आरोपींकडे केलेल्या चौकशीत खालील गुन्हे उघड झाले आहेत.
१)जुन्नर पोस्टे १०५/२०२४ भादवि ४५७,३८०
२)जुन्नर पोस्टे १४८/२०२४ भादवि ४५७,३८०
३) जुन्नर पोस्टे १३३/२०२४ भादवि ४६१,३८०
४)जुन्नर पोस्टे ११९/२०२४ भादवि ३७९
५)जुन्नर पोस्टे ६१/२०२४ भादवि ३७९
           सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तापासकामी जुन्नर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
           सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री पंकज  देशमुख  सो. अप्पर पोलिस अधिक्षक श्री.रमेश चोपडे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो.नि.श्री अविनाश शिळीमकर पो.हवा. दिपक साबळे.पो.हवा.राजू मोमीन पो.ना. संदिप वारे.
पो.कॉ. अक्षय नवले पोलीस मित्र प्रसाद पिंगळे आकाश खंडे  यांनी केलेली आहे.

 

 

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!