ताज्या घडामोडी

मोटारसायकल व मोटारकार अपघातात तरुणाचा दुर्दैवी म्रुत्यू

Oplus_131072

आळेफाटा -( दि १८) कैलास बोडके

पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे मोटारसायकल व स्कोडा कार यांचा अपघातात एका एकोनतीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी म्रुत्यू झाला असल्याची घटना बुधवारी ( दि १७) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली
वैभव शिवाजी वायळ ( वय २९ वर्ष रा खामुंडी ता जुन्नर जि पुणे)  असे या अपघातामध्ये म्रुत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वैभव हा चाकण येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करीत असुन तो त्याच पत्नी मोनिका हिचेसह राजगुरूनगर ता. खेड जि. पुणे येथे राहणेस आहे तो काही कामानिमित्त बुधवारी ( दि १७) सकाळी आठ वाजता त्याचे रहाते घरी खामुंडी येथे आला होता काम संपल्यानंतर वैभव हा सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सर्व कामे उरकून पुन्हा खेड या ठिकाणी त्याच्या स्प्लेंडर मोटारसायकल ( क्रमांक एम.एच.१४/के.सी/७४५० ) वरुन राजगुरुनगर या ठिकाणी जात असताना त्याच्या मोटारसायकलला हाॅटेल नटराज समोर पुणे बाजूकडून नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या स्कोडा मोटारकारने ( एम.एच.१२/ /एच.व्ही/ २७३५) मोटारसायकलला धडक दिल्यामुळे या अपघातामध्ये वैभव याचा जागीच म्रुत्यू झाला
याबाबतची फिर्याद शिवाजी लिंबाजी वायळ (वय ५२ वर्षे धंदा मजुरी सध्या रा. खामुंडी ता. जुन्नर जि. पुणे मुळ रा. ता. संगमनेर जि. अहमदनगर) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली असून पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!