ताज्या घडामोडी

पिंपळवंडीच्या मळगंगादेवी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी विवेक काकडे यांची तर कार्याध्यक्षपदी दशरथ वाळूंज व निव्रुत्ती वाघ यांची निवड 


पिंपळवंडी -( दि १७) प्रतिनिधी

 पिंपळवंडी (ता जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री मळगंगादेवीच्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी विघ्नहर सहकारी कारखान्याचे  संचालक व उद्योजक विवेक काकडे यांची तर कार्याध्यक्षपदी दशरथ वाळूंज व निव्रुत्ती वाघ यांची निवड करण्यात आली आहे
येथील ग्रामदैवत श्री मळगंगा देवीच्या तीन दिवशीय यात्रोत्सवास एक मे पासून सुरुवात होणार आहे.  यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांसह चोळीपातळ अभिषेक  मांडवडहाळे  बैलगाडा शर्यत  छबिना मिरवणूक व कुस्ती आखाडा आयोजन करण्यात आले असून या यात्राउत्सवाच्या  नियोजनासाठी ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या बैठकीत विवेक काकडे यांची अध्यक्षपदी तर  उपाध्यक्षपदी प्रवीण फुलसुंदर,  प्रवीण लेंडे, वैभव कालेकर तसेच कार्याध्यक्षपदी दशरथ वाळूंज निवृत्ती वाघ सचिवपदी राजेश काकडे, भरत शिंदे, सुखदेव लेंडे व खजिनदारपदी संदीप लेंडे, संजय भुजबळ यांची निवडी करण्यात आली
यावेळी बैलगाडा सर्यतीचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र बैलगाडा शर्यत कमिटीची निवड करण्यात आली असून या कमिटीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बैलगाडा मालक  बबन दांगट व उपाध्यक्षपदी किशोर शेटे यांच्या निवडी करण्यात आली असल्याचे विवेक काकडे यांनी सांगितले
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!