ताज्या घडामोडी

पिंपळवंडीत  बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश 


 

 

पिंपळवंडी -( दि १५) पिंपळवंडी काळवाडी व पिंपरीपेंढार येथे बिबट्याच्या घडलेल्या हल्ल्यांच्या घटनांनंतर वनखात्याने ठिकठिकाणी पिंजरे लाऊन बिबट्यांना पकडण्याची मोहिम हाती घेतली होती या मोहिमेत  यापूर्वी  गेल्या पाच ते सहा  दिवसात पाच  बिबट्यांना पकडण्यात आले होते काळवाडी व उंब्रज गावच्या सरहद्दीवर लावलेल्या पिंज-यात आज बुधवारी ( दि १५)  पहाटेच्या सुमारास  पिंपळवंडी येथील वामनपट्टा शिवारात पुन्हा एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे पकडलेल्या बिबट्यांची संख्या सहा  झाली आहे

पिंपळवंडी काळवाडी व पिंपरीपेंढार परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता बिबट्याने लेंडेस्थळ येथील एक महिलेवर हल्ला करुन जखमी केले आहे तर काळवाडी येथे एक आठ वर्षाचा बालक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता शुक्रवारी ( दि १०) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पिंपरीपेंढार येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले होते या सर्व घटनांनंतर वनखात्याने लेंडेस्थळ काळवाडी व पिंपरीपेंढार या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते  शुक्रवारी सकाळी लेंडेस्थळ या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला होता तर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पिंपरीपेंढार या ठिकाणी घटनास्थळी लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी ( दि १०) सायंकाळी एक बिबट्या जेरबंद झाला  तर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे तर शनिवारी ( दि ११) सकाळी तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला असून काळवाडी व उंब्रज गावच्या सरहद्दीवर येडगाव धरणाजवळ आज सोमवारी ( दि १३) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका पाच ते सहा वर्ष वय असलेल्या मादी जातीच्या बिबट्या वनखात्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला त्यानंतर आज बुधवारी पहाटेच्या सुमारास वामनपट्टा या ठिकाणी पुन्हा एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे   गेल्या पाच ते सहा  दिवसात एकूण सहा  बिबट्यांना जेरबंद करण्यात  वनखात्याला यश आले आहे त्यामुळे  नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!