शिरोलीमध्ये स्वच्छतेचा कानमंत्र जपत स्वच्छता अभियानामधून महात्म्यांना अभिवादन

पिंपळवंडी ( दि ४) शिरोली ( बोरी) येथील न्यू इंग्लिश स्कूल व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने महामानवांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले
खेड्यांकडे चला. खेडी स्वयंपूर्ण झाली तरच देशाची प्रगती होईल हे महात्मा गांधीजींचे स्वप्न संत गाडगे महाराजांनी कीर्तनातून व स्वच्छतेतून पूर्ण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा ग्रामविकासाचा नारा दिला लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री महेंद्र बोऱ्हाडे यांनी सरपंच प्रिया खिलारी, उपसरपंच दत्तात्रय डावखर व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष खिलारी, माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजू पोळ, अजित खिलारी तंटामुक्तीचे अध्यक्ष महेंद्र खिलारी , तसेच शिक्षण प्रेमी व ग्रामस्थांना सोबत घेऊन स्वचछता अभियान राबविले
शालेय स्वच्छता व विद्यार्थ्यांचे आरोग्य खूप महत्त्वाचे असल्याने गेली कित्येक वर्ष विद्यालयाच्या पाठीमागे व रोडच्या पलीकडे कचऱ्याच्या खचाखच भरलेल्या कुंड्या जेसीबी च्या साहाय्याने इतरत्र हलवून स्वच्छतेचा जागर मांडला. विद्यालयाच्या आजूबाजूला असलेल्या सर्व गवतावर या वरही कीटकनाशक फवारून खऱ्या अर्थाने वरील समाजसुधारकांना व नेत्यांना कृतीतून आगळेवेगळे अभिवादन केले. या कामी अजित खिलारी व राजु पोळ यांनी पुढाकार घेऊन शाळेला सहकार्य केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व सेवकवर्ग उपस्थित होता. मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे यांची कल्पकता व समय सुचकतेला सर्व ग्रामस्थांनी दाद दिली. विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व ग्रामस्थ आपल्यासमवेत आहोत अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली.



