पिंपरीपेंढार येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

पिंपरी पेंढार -( दि.9) कैलास बोडके
पिंपरीपेंढार शिवारातील पीर पट या ठिकाणी राहणा-या एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले असल्याची घटना बुधवारी ( दि ९) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली सुजाता रवींद्र डेरे ( वय वर्ष ४२ वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की पिंपरीपेंढार येथील पीरपट शिवारात रवींद डेरे हे शेतकरी रहात असून
त्यांची पत्नी सुजाता या त्यांच्या घराजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यात जनावरांना चारा घालत होत्या त्यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले
यापूर्वीही या ठिकाणी एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले होते व दोनच दिवासांपूर्वी उंब्रज या ठिकाणी एका मेंढपाळ महिलेवर हल्ला करुन जखमी केले आहे ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा पिंपरीपेंढार येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्यामुळे येथील ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहेत

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक अमोल सातपुते ओतुर वनपरीक्षेत्र अधिकारी व वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून वनखात्याने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे



