ताज्या घडामोडी

मोबाईल संस्कृतीमुळे माणसे विचारांपासून दुरावली – ह.भ.प.दुराफेमहाराज

येडगाव ( दि २७) प्रतिनिधी

कोरोना नंतरचे जग आणि झालेला दूरगामी परीणाम
केवळ मोबाईल संस्कृतीमुळे झालेला आहे ,आचार, विचारां पासून लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच माणसे आज दूर गेली असून प्रामाणिकपणा ,विनम्रता या बाबी मुळीच दिसून येत नाहीत असे प्रतिपादन वारकरी सांप्रदयाचे भूषण ह.भ.प.
श्रीकांत महाराज दुराफे यांनी येडगाव येथील येडेश्वर विद्यालयात केले
विद्यालयाने राबविलेल्या संस्कार आणि संस्कृती या व्याख्यान मालेचा सप्टेंबर महिना हा तिसरा महिना असून सद्याच्या काळात मुलांची मानसिकता व त्याचा अभ्यासावर झालेला वाईट परिणाम यावर ते बोलत होते या कार्यक्रमाच्या प्रारंभी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाशशेठ नेहरकर यांनी प्रतिमापुजन केले
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की सकाळ पासून संध्याकाळपर्यंत दोन जि,बी चा डाटा संपवणे
म्हणजे खूप काही पराक्रम केल्या सारखे आहे अशा अविर्भावात सारेच वावरत आहेत, त्यामुळे एकाग्रता राहिली नाही मुले एका ठिकाणी 10मिनिटे बसून मोबाईलशिवाय अभ्यास करू शकत नाही ही दुर्दैवी बाब आहे आपल्या आजूबाजूचे सुंदर जग
सुंदर माणसे आपण हरवून बसलो ,याचे भान कुणालाच राहिलेले नाही, या जगात नुसता
माणूसच नाही तर प्रत्येक घटकांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे असे त्यांनी सांगितले याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की सत्य परिस्थिती सोडुन कल्पनेच्या जगात माणूस निर्विवाद वावरतो आहे ,निसर्ग माझा गुरू ही भावना आज उरलीच नाही,परिणामी वाचन लेखन, मनन, चिंतन,या बाबी सोडून तासनतास हातात मोबाईल घेऊन स्वतःच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम करुन घेत आहे,ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय परमेश्वर समजत नाही, म्हणूनच विद्यार्थी दशेत असतानाच अहिंसा, दया, शांती,
प्रेम यांची महापूजा मांडावी लागेल ,व अभ्यासात स्वतःला गुंतुवून घेणे गरजेचे आहे,असे मत
मांडले, या सुंदर क्षणाचा आनंद सर्वच शिक्षक शिक्षकेतर ,व ग्रामस्थ व विद्यार्थी मित्रांनी मनमुराद पणे घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री, एस, इ, अभंग यानी केले तर आभार मुख्याध्यापक श्री,ए, एस, काकडे यांनी मानले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!