ताज्या घडामोडी

गोमाता पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

आळेफाटा -( दि २८) प्रतिनिधी आळेफाटा ( ता जुन्नर) येथील अग्रगण्य समजली जाणारी सातत्याने अ वर्ग लेखापरीक्षण शेरा प्राप्त असलेली गोमाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे दि 23 सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.यावेळी सहकारमहर्षी संस्थापक कै भिमाजीशेठ कमळू गडगे यांच्या 76 व्या जयंती प्रित्यर्थ त्यांच्या आठवणींस उजाळा देण्यात आला.यावेळी विद्यमान अध्यक्ष सुरेश भिमाजी गडगे, सचिव रवींद्र गडगे, श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे व्यवस्थापक जालिंदर पादीर आदींनी आपापली मनोगते व्यक्त केली.
यावेळी संचालक गजानन गडगे, भानुदास गडगे, दत्तात्रय गडगे, नितीन चौगुले, शांताबाई भिमाजी गडगे, संगीता शिंदे, आशा आल्हाट, तज्ञ संचालक अर्जुन अमूप, संतोष साबळे, अशोक सीताराम गडगे, संस्थेचे सभासद, कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन मुख्य व्यवस्थापक शिवाजी बबुशा गडगे यांनी केले.उपस्थित सदस्यांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष राहुल खोकले यांनी केले.यावेळी संस्थेला जवळपास 2 कोटी 33 लाख उत्पन्न झालेले असून जवळपास 31 लाख रु नफा झालेला असून सभासदांना 12% लाभांश वाटप करण्यात येणार आहे.संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे व ठाणे जिल्हा असून संस्थेच्या आळेफाटा, बनकरफाटा व वाशी येथे शाखा असून लवकरच पुणे येथे चौथी शाखा सुरु करण्यात येणार असल्याबाबतची माहिती सचिव रवींद्र गडगे यांनी दिली.संस्थेचे 2092 सभासद असून अधिकृत 2 कोटी रु चे भागभांडवल असून 21.50 कोटी रु च्या भरघोस ठेवी आहेत.संस्थेला लेखापरीक्षण शेरा प्रतिवार्षिक अ मिळत असून संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षमस्थितीत असलेबाबतची माहिती संचालक वर्गामार्फत देण्यात आली.यावेळी संस्थेचे जुने सभासद, दैनंदिन ठेव प्रतिनिधी व उपस्थित सर्वच सभासदांचा शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.वार्षिक सर्वसाधारण सभा सांगता कोंडीभाऊ वामन यांच्याद्वारे पसायदानाने करण्यात आली.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!