ताज्या घडामोडी

पिंपळवंडीत संपन्न झाला माहेरवासिनींचा वार्षिक  भगीनी स्नेहमेळावा

पिंपळवंडी ( दि.१२) प्रतिनिधी

पिंपळवंडी ( वामनपट्टा) येथील सासरी गेलेल्या माहेरवासिनिंचा भगिनी स्नेहमेळावा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला

लग्न होऊन सासरी गेलेल्या पिंपळवंडी ( वामनपट्टा) येथील माहेरवासिनिंनी वामनपट्टा माहेरचा कट्टा या ग्रुप स्थापन केला असून या ग्रुपच्या माध्यमातून  येथील ग्रामदैवत मळगंगा देवी मंदिर या ठिकाणी वार्षिक भगिनी स्नेहमेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या प्रारंभी गावच्या वेशीपासुन तर मळगंगामाता मंदिरापर्यंत देवीच्या चोळीपातळाची मिरवणूक काढण्यात आली व देवीला चोळीपातळ अर्पण करण्यात आले त्यानंतर सर्व माहेरवासिनींनी मंगळागौर व स्नेहसंम्मेलन फगुड्या व इतर कार्यक्रम सादर करत मनमुराद आनंद लुटला या कार्यक्रमासाठी तिन पिढ्यांमधील माहेरवासिनींनी सहभाग घेतला या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून  सामाजिक कार्यकर्ते टी आर वामन अरुण वामन रोहिदास वामन मंगेश वामन  ग्रामपंचायत सदस्य योगेश वामन उपस्थित होते या कार्यक्माचे संयोजन सुनिता वामन जाधव आशालता वामन महाले मालन वामन कु-हाडे  यांनी केले यावेळी सर्व उपस्थित माहेरवासिनिंना ग्रुपच्या वतीने भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!