ताज्या घडामोडी

बिबट्याने हल्ला केलेल्या तरुणाची म्रुत्यूशी झुंज अखेर ठरली अपयशी : गुंजाळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर  

पिंपळवंडी -( दि ४) प्रतिनिधी

कांदळी येथील सुतारठिके वस्ती येथे   मोटारसायकलवरुन जात असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण गंभीर  जखमी झाला होता या तरुणाचा मंगळवारी ( दि ५) रात्री उपचरादरम्यान म्रुत्यू झाला या तरुणाची म्रुत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली मंगेश रामदास गुंजाळ ( वय २६ वर्ष रा.कांदळी ता जुन्नर जि पुणे) असे या तरुणाचे नाव आहे

याबाबत माहिती अशी की मंगेश हा रविवारी ( दि ३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कांदळी येथील सुतारठिके वस्तीत दुध घालण्यासाठी मोटारसायकल वरुन जात असताना रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे मोटारसायकलवर उडी मारली व मंगेश मोटारसायकल घेऊन खाली पडला याचवेळी संतोष गुंजाळ व अक्षय महाले हे दोघेजण मंगेश याच्या पाठीमागून मोटारसायकलवर येत होते  मंगेश याच्यावर बिबट्याचा हल्ला होत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा केला व त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला या घटनेत मंगेश याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता  त्याच्यावर आळेफाटा येथील एका खाजगडरुग्णालयात उपचार सुरु होते त्याच्या मेंदूवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्यामुळे या तरुणाचा मंगळवारी ( दि ५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास  म्रुत्यू झाला मंगेश हा शेतकरी कुटुंबातील असून आई व वडील नसून  त्याला चार बहिनी आहेत सर्व कुटुंबाची जबाबदारी मंगेश याच्यावर होती घरातील कर्ता माणूस गेल्यामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शासनाकडून मंगेश याच्या कुटुंबला आर्थिक मदत  करण्यात यावी अशी मागणी कांदळी ग्रामस्थांनी केली आहे

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!