ताज्या घडामोडी

हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांविरद्ध पोलीसांची धडक कारवाई पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

जेजुरी -( दि ६) कैलास बोडके

हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांच्या विरूद्ध जेजुरी पोलिसांनी धडक कारवाई करत बाराशे पंचवीस लीटर  गावठी दारु व दहा हजार लीटरचे कच्चे रसायन असा  एकुण पाच लाख चोबीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे हे पोलीस स्टेशनला हजर असताना यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, ढोलेवाडी गावचे हद्दीत इसम नामे संतोष राठोड हा नाझरे धरणाच्या कडेला शेतात विहीरीजवळ आडोशाला गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची भट्टी तयार करत आहे.

बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी दोन पंचांना बोलावुन घेवुन, पंचासह व पोलीस कर्मचारी यांच्यासह शासकीय वाहनाने जावुन  छापा टाकला असता हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी भट्टी चालु असल्याचे दिसुन आले. सदर ठिकाणी ०२ लोखंडी पातेले, त्यामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे १०,००० लीटर कच्चे रसायन, ३५ लीटरचे निंळे रंगाचे प्लास्टीकचे ३५ कॅन्ड त्यामध्ये १,२२५ लीटर तयार गावठी हातभट्टी दारु, १० मन लाकडी सरपण, काळा गुळ प्रत्येकी ०१ किलो वजनाचे सुमारे १२० ढेपा, एकुण १,२०० किलो, ०१ जर्मनचा चाटु त्यास नळी असलेला, ०१ जर्मनची थाळी असा माल व तयार दारु असा एकुण ५,२४,०००/- रु. किमतीचा माल मिळुन आला. कच्चे रसायन व जळके रसायन, लाकडी सरपण साहीत्य असे जागीच नाश करण्यात आला आहे. गावठी हातभट्टी दारु मानवी आराग्यास अपायकारक आहे हे माहीती असुनही दारु तयार करणरा इसम संतोष राठोड हा पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला असून विविध कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण अधीक्षक पकंज देशमुख,बारामती अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील,पोलीस हवलदार अण्णासाहेब देशमुख,प्रविण शेडे, पोलीस मित्र खंडागळे यांच्या पथकाने केली आहे

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!