ताज्या घडामोडी

बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरूणाच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत

 

कांदळी  -( दि ७) प्रतिनिधी
कांदळी ( ता.जुन्नर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात म्रुत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबाला वनखात्याकडून दहा लाख रुपयांची मदत करण्यात आली असल्याची माहिती उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी दिली
येथील तरुण शेतकरी मंगेश रामदास गुंजाळ यांच्यावर रविवारी ( दि ३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला होता या हल्ल्यात मंगेश हा गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी ( दि ५) रात्री त्याचा दुर्दैवी म्रुत्यू झाला याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने याची दखल घेत प्रशासनाला सदर कुटुबियांस मदत करण्याचे आदेश दिले.त्यानुसार वनखात्याकडून १० लक्ष रूपयाचा धनादेश विकास रेपाळे यांच्या हस्ते व
उपवनसंरक्षक अमोल. सातपुते सहाय्यक वन अधिकारी अमित भिसे वनक्षेत्रपाल व्ही एम काकडे सहाय्यक वनरक्षक संदेश पाटील सरपंच डाॅ.पल्लवीताई भोर उपसरपंच विशाल रेपाळे कृषिभुषण श्री. मुरलीधर गुंजाळ यांचे उपस्थितीत कुटुंबातील सदस्य उत्तम गुंजाळ, गणपत गुंजाळ आणिल घाडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या प्रसंगी अनिल भोर, रेखाताई घाडगे प्रियांका घाडगे, सुनिल गुंजाळ अक्षय महाले संतोष गुंजाळ चेतन अस्वले उपस्थित होते

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!