ताज्या घडामोडी

बक-या विकत घेऊन देण्याचे अमिष दाखवून दरोडा टाकणा-या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश 

उरुळीकांचन  ( दि ८) प्रतिनिधी

व्यवसाय करण्यासाठी बकऱ्या विकत घेवून देण्याचा बहाणा करून दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळीला   जेरबंद. करण्यात. स्थानिक गुन्हे शाखा व ऊरूळी कांचन पोलीस स्टेशनला यश आले आहे

याबाबत माहिती अशी की हैद्राबाद येथील इसमास व्यवसाय करण्यासाठी स्वस्त दरात बकऱ्या घेवून देतो असे सांगून ऊरुळी कांचन येथे बोलावून घेवून त्या इसमास व त्याचे साथीदारांना बकऱ्या दाखविणेसाठी शेताकडे नेले आणि त्या ठिकाणी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचे जवळी रोख रक्कम पाच लाख रुपये, मोबाईल, गळयातील चेन असा ५,८३,०००/- किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता, याबाबत अब्दुला लालबादशाह शेख ( वय ३० वर्षे रा. हैद्राबाद, जेडीमेटला एरीया, जि. रंगारेड्डी राज्य आंध्रप्रदेश ) यांनी ऊरूळी कांचन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती या फिर्यादीवरुन उरुळीकांचन पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करणेत आला होता

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. गुन्हयाची कार्यपद्धतीचा अभ्यास केला. गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल काढण भोसले ( रा. कोळगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर ) याने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याचे समजले. तसेच सदरचा गुन्हेगार हा त्याचे साथीदारांसोबत सध्या खोपोली परीसरात राहत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांचे बाबत पथकाने माहिती प्राप्त करून घेतली.

स्थानिक गुन्हे शाखा व ऊरुळी कांचन पोलिस  स्टेशन कडील पथक गुन्हयाचा तपास करत असताना संशयित गुन्हेगार अमोल भोसले हा त्याचे साथीदारांसोबत लोणावळा परीसरात आला असल्याची बातमी स्था.गु.शाखेच्या पथकाला मिळाली. बातमीप्रमाणे सापळा लावून १) अमोल काढण भोसले वय ३२ वर्षे रा. कोळगाव पांढरेवाडी ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर २) शिवा पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय १९ वर्षे रा. वेठेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहदनगर ३) श्याम पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय २३ वर्षे रा. वेठेकरवाडी ता.श्रीगोंदा जि. अहदनगर यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे. यातील आरोपी अमोल काढण भोसले यांचे विरुध्द पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हयात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरीचे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी  मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री स्वप्नील जाधव, दौंड विभाग, दौंड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ऊरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोनि शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल गावडे, पोसई अमित सिदपाटील, पोसई पाडुळे पोलीस अंमलदार सचिन घाडगे, दिपक साबळे, अजित भुजबळ, विक्रम तापकीर, योगेश नागरगोजे, राजु मोमीन, अतुल डेरे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू वीरकर यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास ऊरळी कांचन पोलीस स्टेशन हे करत आहे.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!