ताज्या घडामोडी

खुनाच्या गुन्हयातील गुन्हेगारास विनापरवाना गावठी पिस्टल बाळगले प्रकरणी केले जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नारायणगाव -( दि १३) प्रतिनिधी

खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारास विनापरवाना पोस्टल बाळगल्याप्रकरणी जेरबंद करण्यात पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे

याप्रकरणी पवन थोरात ( रा मंचर ता आंबेगाव जि पुणे)  असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडुन मिळालेली माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना मा पोलीस अधीक्षक, श्री पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण पोलीसांना दिलेल्या आहेत.

दिनांक 8/3/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सराईत गुन्हेगार पवन थोरात रा. मंचर हा त्याच्या ताब्यात असलेले एक गावठी पिस्टल कमरेला लावून मोटरसायकल वर बसून नारायणगाव-मांजरवाडी रोड ला येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने मिळाले बातमीचे ठिकाणी जाऊन सापळा रचून एका संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पवन सुधीर थोरात वय 24 वर्षे, रा. चाळीस बंगला रोड, मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले असून मोटार सायकलसह एकूण 61,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी पवन सुधीर थोरात रा. मंचर याचे विरोधात खूनाचे ०२ गुन्हे, खुनाचा प्रयत्न, मारामारी, आर्म अॅक्ट अंतर्गत एकूण ०९ गुन्हे दाखल असून त्याचेवर यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत देखील कारवाई करणेत आलेली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर, पो.स.ई. अभिजित सावंत, पो.हवा. दिपक साबळे, पो.हवा. विक्रम तापकीर, पो.हवा. राजू मोमीन, पो.हवा. अतुल डेरे, पो.ना. संदिप वारे, पो.कॉ. अक्षय नवले, पो.कॉ. निलेश सुपेकर यांनी केलेली आहे.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!