ताज्या घडामोडी

पतसंस्थेमधील थकबाकी दारांना आंबेगाव तहसीलदारांचे अभय… मिळकतीचा ताबा देण्यास टाळाटाळ..

 

पिंपळवंडी -( दि १७) प्रतिनिधी

महसूल खात्याने पतसंस्थांना थकबाकीदारांकडून कर्ज वसुली करताना सहकार्य करण्याऐवजी आंबेगाव तहसीलदारांचे थकबाकीदाराला अभय मिळत असल्याची घटना नुकतीच घडली आहे. पतसंस्थेच्या थकबाकीदाराच्या मिळकतीचा ताबा देण्यास आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व यशवंत नागरी पतसंस्थेचे चेअरमन महादेव वाघ यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी जुन्नर,आंबेगाव तालुक्यातील पतसंस्था मोलाचं काम करीत आहे. परंतु दिवसेंदिवस पतसंस्थांना कर्ज वसुली करण्याचा गंभीर प्रश्न तयार झाला आहे. त्यामुळे नाईलाजाने पतसंस्थांना थकबाकी कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करावी लागते. कारवाई करताना कर्जदाराने तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम क्र.१०७ चे अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्याकडून तहसीलदारांमार्फत दिला जातो. त्यानंतर तारण मालमत्तेच्या लिलावाची पतसंस्थां कारवाई करतात.

जिल्हाधिकारी पुणे यांच्या दि.१२ जानेवारी २०२४ आदेशानुसार आंबेगाव तहसीलदार यांनी कळंब (ता.आंबेगाव) येथील यशवंत नागरी पतसंस्थेच्या काही थकबाकीदार कर्जदारांना मिळकतीचा ताबा देण्यासाठी दि.२९ फेब्रुवारी २०२४ च्या नोटीसा काढण्यात आल्या होत्या. परंतु त्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंबेगाव चे तहसीलदार संजय नागटिळक यांनी जाणीवपूर्वक ताबा देण्यास असमर्थता दाखवली.

त्यानंतर पुन्हा संबंधित थकबाकीदार कर्जदारांना दि.१४ मार्च २०२४ रोजी मिळकतीचा ताबा देण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. यशवंत नागरी पतसंस्था वारंवार आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक यांच्या संपर्कात असताना त्यांनी त्यादिवशी नायब तहसीलदार अनंत गवारी यांच्या उपस्थितीत ठराविक कर्जदार थकबाकीदारांचा मिळकतीचा ताबा सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान दिला. परंतु काही थकबाकीदारांचा ताबा आम्ही देणार नाही अशी भूमिका नायब तहसीलदार गवारी यांनी वरिष्ठांच्या सांगण्यावरून घेतली असल्याचे यशवंत पतसंस्थेला सांगितले.

आंबेगाव महसूलचा अजब कारभार
—————————
यशवंत नागरी पतसंस्था पिंपळवंडी (ता.जुन्नर) पतसंस्थेच्या थकबाकीदार कर्जदारांच्या मिळकतीचा ताबा थांबविण्याचा वरिष्ठ कार्यालयाचा आदेश नसताना जाणीवपूर्वक थकबाकीदाराकडून तक्रार अर्ज घेऊन पतसंस्थांना मिळकतीचा ताबा न देण्याचे घाणेरडे कामकाज तहसीलदार संजय नागटिळक यांच्या कडून होत असल्याचे चेअरमन महादेव वाघ यांनी म्हटले आहे. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक यांना सूचना देऊनही त्याकडे तहसीलदार सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक यांचा मनमानी कारभार…
—————————————–
यशवंत नागरी पतसंस्थेने मिळकतीचा ताबा देण्यासाठी रीतसर नोटीसा देऊनही संबंधित दिलेल्या तारखांना ताबा देण्यासाठी उपस्थित न राहणे, किंवा जाणीवपूर्वक सूर्यास्तानंतर ताबा देण्यासाठी उपस्थित राहणे. कर्ज थकबाकीदारांना कर्ज भरण्यासाठी आणखी दोन महिने मुदत द्या अशी भूमिका घेणे असे अजब प्रकार आंबेगाव तहसील कार्यालयाचे चालू असून तहसीलदार संजय नागटिळक मनमानी करीत असून सहकार्य करीत नसल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना असल्याची तक्रार जुन्नर तालुका नागरी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ यांनी केली आहे.

दिवसेंदिवस पतसंस्थांच्या थकबाकीचे प्रमाण वाढत असताना दोन ते चार वर्ष कर्ज थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांना महसूल खात्यामार्फत अभय मिळत आहे. कर्ज भरणा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची मुदत देण्याचे अधिकार नसताना महसूल खाते कर्जदारास पाठीशी घालीत असल्याची तक्रार यशवंत नागरी पतसंस्था पिंपळवंडी (ता.जुन्नर) यांनी जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन कडे केली आहे.

अन्यथा सहकार मंत्र्यांना भेटणार
————————-
आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी गांभीर्याने दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दाद मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!