ताज्या घडामोडी

पिंपळवंडीत पुन्हा भर दुपारी चोरी : चोरट्याने सव्वादोन लाखाचा ऐवज पळविला

आळेफाटा  -( दि १९) प्रतिनिधी

पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथील तोतरबेट या ठिकाणी एकाच रात्रीत तिन ठिकाणी घरफोडी करुन लाखो रूपयांचा ऐवज लंपास केली असल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी घडली असतानाच येथील बाम्हणेमळा शिवारात भर दुपारी एका अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात असलेले सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे दागिने पळवून नेले असल्याची घटना सोमवारी ( दि १८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा घडली आहे
याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील देवराम गबाजी बाम्हणे हे व्रुद्ध शेतकरी हे घरी असताना सोमवारी ( दि १८)  रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या  सुमारास अंदाजे तीस  ते पस्तीस  वयोगटातील व रंगाने सावळा असलेला अंगामध्ये डार्क निळे रंगाचा फूल शर्ट असलेला एक अज्ञात इसम बाम्हणे यांच्या घरात आला व त्याने  घरातील माणसांची ओळख सांगुन तुमचे राजुरी येथील मामांनी तुमचे घरातील कपाटातील पावती मागीतली आहे असे सांगुन त्याने घरामध्ये असलेल्या
कपाटातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे एक  काळे मणी असलेले सुमारे तिन तोळे वजनाचे,त्यामध्ये 2 सोन्याच्या वाटया असलेले सोन्याचे मणीमंगळसुत्र पन्नास हजार रुपये किमतीचे  एक सोन्याचे मणी मंगळसुत्र काळे मणी असलेले व दोन सोन्याच्या वाट्या असलेले सुमारे एक तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र पाच हजार रुपये किमतीची एक ग्रॅम वजन असलेली एक  नाकातील नथ व वीस हजार रुपये किमतीची चार ग्रॅम असलेली सोन्याची अंगठी त्या  अइाात इसमाने चोरून नेले असल्याची फिर्याद देवराम बाम्हणे यांचे नातू ओकांर भास्कर बाम्हणे ( वय 25 वर्ष रा बाम्हणेमळा ता.जुन्नर जि.पुणे यांनी आळेफाटा पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे या फिर्यादीवरुन आळेफाटा पोलिसांनी या अज्ञात चोरट्याच्या विरोधात आळेफाटा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतिष होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पारखे करत आहेत
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!