ताज्या घडामोडी

पिंपळवंडीत बिबट्याने तरूणाच्या अंगावर घेतली झेप :तरुण थोडक्यात बचावला 

पिंपळवंडी -( दि २० ) प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर व माणसांवर सातत्याने हल्ले होत आहे पिंपळवंडी ( ता.जुन्नर) येथे  भिंतीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणावर हल्ला केला मात्र या तरूणने प्रसंगसावधानता दाखविल्यामुळे हा तरुण थोडक्यात बचावला ही घटना मंगळवारी ( दि १९) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली प्रदीप गंगाराम माळी(वय १९)असे बिबट्याच्या हल्ल्यामधुन वाचलेल्या तरुणाचे नाव आहे

याबाबत माहिती अशी की पिंपळवंडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सार्वजनिक शौचालय आहे प्रदीप हा सार्वजनिक शौचालयाकडे जात असताना त्याच्या हातात असलेल्या बॅटरीचा उजेड सुलभ शौचालयाच्या भिंतीवर दबा धरून बसलेल्या बिबट्यावर पडला त्यानंतर अचानक बिबट्याने प्रदीपच्या अंगावर झेप घेतली असता प्रदीप हा  वेगाने ओरडत घराच्या दिशेने पळाला तो,पळत असताना एका ठिकाणी पडला व  त्यानंतर पुन्हा उठुन पळाला  बिबट्या प्रदीप याच्या पाठीमागेच येत होता.त्याच्या  ओरडण्याच्या आवाजाने प्रदिपची  आई व घरातील सदस्य बाहेर आले.त्यांनी देखील मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथुन पळ काढला दैव बलवत्तर म्हणून आपण बिबट्याच्या हल्ल्यामधुन वाचलो असल्याची भावना यावेळी त्याने व्यक्त केली

पिंपळवंडी परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कांदळी या ठिकाणी मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात मंगेश गुंजाळ या तरूणाचा म्रुत्यू झाला होता त्यानंतर दोन ते तिन दिवसातच उंब्रज या ठिकाणी एका बालकावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे आयूष सचिन शिंदे हा चार वर्षाचा बालक गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली होती या दोन्हीही घटना ताज्या असतानाच पिंपळवंडी येथील तरुणावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य शामभाऊ माळी व येथील ग्रामस्थांनी केली आहे

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!