राजकारणामधील अजातशत्रू मंगेश अण्णा काकडे

महाराष्टाच्या राजकारणात बरेच पुतणे त्यांच्या चुलत्यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवताना दिसतात. त्यात अण्णा एक आहेत जे आमदार कै. दशरथशेठ काकडे ह्यांचा राजकीय वारसा तालुक्यात समर्थपणे पुढे नेताना दिसताय.
अण्णा म्हटले की आपसूकच आदर वाटतो आणि त्यात त्यांचा मनमिळावू स्वभाव अजून भर टाकून जातो. एक अजातशत्रू, प्रेमळ आणि विनम्र असं अण्णांचं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा गोड स्वभाव लोकांना आपलेसे करतो, जवळीक वाढवतो.
त्यांचं शिस्तबद्ध जीवन अनुकरणीय आहे. सकाळी उठल्यानंतर व्यायाम, योगा आणि प्राणायाम करून ते स्वतःला दिवसभराच्या कामकाजासाठी फिट ठेवतात. नावातच “मंगेश” असणारे अण्णा खूप धार्मिक आहेत हे बरेच कमी लोकांना माहिती असेल.
प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता अशी त्यांची जनमानसात प्रतिमा आहे. प्रत्येकाला न चुकता वाढदिवसांच्या शुभेच्छा देणं ही त्यांची खास ओळख आहे आणि त्यांच्या या सवयीबद्दल सगळ्यांनाच कुतूहूल असतं.
अण्णांचा ड्रेसिंग सेन्सही खूपच छान आहे, त्यामुळे ते इतर पुढाऱ्यांपेक्षा जास्त भारदस्त आणि आकर्षक दिसतात. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही ह्याची भुरळ पडते
ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आज जनतेच्या मनातील झेडपीपर्यंत येऊन पोहोचला आहे आणि भविष्यात तो परत एकदा त्यांच्या घराण्याच्या राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा बाळगूया
अशा या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
त्यांचा राजकीय आलेख असाच चढता राहो, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो हीच पिंपळेश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक,
अभिजित तोतरे आणि मित्र परिवार




