वडगाव (कांदळी), मुटकेमळा येथील प्रतापगड प्रतिकृती ठरली तालुक्यात चर्चेचा विषय

वडगाव कांदळी ( प्रतिनिधी)आदर्श निर्मल ग्राम वडगाव कांदळी) च्या मूटकेमळा येथील चि. सार्थक रमेश मुटके, सुयोग मुटके, जान्हवी मुटके, समर्थ मुटके या शालेय विद्यार्ध्यानी दिवाळी सुट्टीत किल्ले बनवा स्पर्धा २०२५ मध्ये भाग घेऊन “शिवतीर्थ प्रतापगड” ची हुबेहूब प्रतिकृती बनवली असून ती पाहण्यासाठी तालुकाभरातून असंख्य शिवप्रेमी भेट देत आहेत;
किल्ला बनवताना विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष किल्ले प्रतापगड चा बारकाव्याने अभ्यास करून अगदी अचूक मांडणी करून ८ ते १० दिवसात किल्ला तयार केला; विशेषतः किल्ला बनवत असताना कुठेही प्लास्टिक चा वापर न करता पर्यावरण पूरक बनवून एक प्रकारे प्रदूषण मुक्त दिवाळी चा ही संदेश दिला आहे; मनसेचे जिल्हाप्रमुख मकरंद पाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदार संघ युवक अध्यक्ष वैभव काळे, शिरोली ग्राम पंचायत सदस्य बाजीराव मूळे, सामाजिक कार्यकर्ते सागर दहितुले यांनी किल्ल्याला भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले; उपस्थितांचे स्वागत रमेश मुटके यांनी केले; याप्रसंगी चि. सार्थक याने संपूर्ण किल्ल्याची माहिती देवून, प्रतापगड पायथ्याशी जावळी खोऱ्यातील अफजलखान वध देखावा ची माहिती पोवाड्यातून दिली तेव्हा उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले यावेळी साईलक्ष्मी पतसंस्था संचालिका पूजा मुटके, उद्योजक अभिषेक मुटके, संदिप पाचपुते, आकाश भोर, करण मुटके, योगेश मुटके, पल्लवी भोर, आदर्श शिक्षक बाळासाहेब मुटके व ग्रामस्थ उपस्थित होते.



