ताज्या घडामोडी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : मोटारसायकल चोरणा-या तरुणास केली अटक

नारायणगाव -( दि २८) प्रतिनिधी

पुणे नाशिक महामार्गावरुन चोरीची मोटारसायकल घेऊन जाणाऱ्या एका तरुणास अटक करण्यात पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे

 गणेश रमेश काकडे ( वय २८ रा माळवस्ती पेठ ता आंबेगाव जि.पुणे)  असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे  याबाबत सविस्तर माहिती अशी की पुणे ग्रामीण जिल्ह्यातील गणपती उत्सवाच्या अनुषंगाने दि.२७/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना नारायणगाव येथे एक इसम मोटारसायकल वरून मंचर च्या बाजूने नारायणगाव कडे निघाला होता सदर इसमाच्या गाडीला दोन्ही बाजूला नंबर नव्हता त्यामुळे त्या इसमाला गुन्हे शाखेच्या पथकाने साइडला थांबऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गणेश रमेश काकडे वय २८ रा. माळवस्ती, पेठ ता. आंबेगाव जि. पुणे. असे सांगितले. त्याचे चौकशी दरम्यान सदर इसम हा सराइत मोटारसायकल चोर असल्याचे समजले त्याच्यावर यापूर्वी चाकण, खेड, आळंदी, वडगाव मावळ इ. पोलिस स्टेशन मध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या ताब्यामध्ये एक स्क्रूड्रायवर तसेच नट, बोल्ट खोलण्याचा पान्हा मिळून आला आहे. तसेच त्याच्या ताब्यात मिळून आलेली मोटारसायकल सुद्धा त्याने दोन दिवसांपूर्वी चाकण येथून चोरल्याचे कबुल केले. सदर इसमा विरोधात नारायणगाव पोस्टे येथे गु.र.नं. ७२०/२०२३ मुंबई पोलीस कायदा कलम १२२(ब),(ड) नुसार कार्यवाही केली आहे

  सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तापासकामी नारायणगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. गणेशोत्सव व नवरात्री उत्सव काळात स्थानिक गुन्हे शाखा अशा संशयितांच्या हालचालींवर  बारकाईने लक्ष ठेवून राहणार आहेत.

 सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल सो. अप्पर पोलिस अधिक्षक श्री. मितेश घट्टे सो., यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर पो.स.ई. अभिजित सावंत पो.हवा. दिपक साबळे. पो.हवा. विक्रम तापकीर.पो.हवा.राजू मोमीन पो.हवा अतुल डेरे पो.ना. संदिप वारे.पो.कॉ. अक्षय नवले पो.कॉ. निलेश सुपेकर.यांनी केलेली आहे.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!