ताज्या घडामोडी

तटस्थ भूमिका सोडून आमदार अतुल बेनके जाणार अजित पवार गटात

 

 

नारायणगाव -: (वसंत शिंदे) जुन्नर तालुक्याच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दि२५ रोजी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, या दरम्यान तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या गटाची जुन्नर तालुक्यावर पकड मजबूत करण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न आहे. यापूर्वीच तालुक्यातील विघ्नहर कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या आमंत्रणावरून हजेरी लावली होती. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील सर्वपक्षीय मंडळी हजर होती. या कार्यक्रमांमध्ये शरद पवार हे सत्यशील शेरकर यांना विधानसभेसाठी आपला पाठिंबा देतील अशी तालुक्यात चर्चा होती. सदर कार्यक्रमाला विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी आपली हजेरी लावली होती. मात्र कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी भाषणामध्ये अतुल बेनके यांचे नाव घेतले नाही. संपूर्ण कार्यक्रमांमध्ये त्यांनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. यावरून शरद पवार हे आमदार अतुल बेनके यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले. विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात न जाता आपली तटस्थ म्हणून भूमिका जाहीर केली होती. वास्तविक बेनके हे अजित पवार गटात यापूर्वीच झुकल्याचे दिसत होते. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री पद व वित्त मंत्रालय मिळाल्यानंतर जुन्नर तालुक्याचा विकास करण्यासाठी आणि निधी मिळवण्यासाठी अजित पवार गटात सामील होण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे, बेनके आपली तटस्थ भूमिका सोडून अजित पवार गटात पिंपळवंडी या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रवादी शेतकरी मेळाव्यात खुलेआम सामील होण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिले आहेत. त्यामुळे यापुढील काळात जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अटीतटीचा संघर्ष दिसू लागेल.
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!