ताज्या घडामोडी

कामगारांचे मोबाईल चोरणा-या सराईत मोबाईल चोरास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक 

ओतुर -( दि ४) प्रतिनिधी ओतूर येथील कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करण्यात पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या सराईत चोरट्याकडून चोरीस गेलेले विविध कंपन्यांचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अर्जुन बाळू माळी वय १९,रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे असे अटक करण्यात आलेल्या सराईत मोबाईल चोराचे नाव आहे

याबाबत माहिती अशी की ओतूर पोलीस स्टेशन गु.र.नं ४९०/२०२३ भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल होता.फिर्यादी नामे राजू जगन्नाथ साव वय ३२ रा. खामुंडी, ओतूर मूळ रा.गोपालजंगी बिहार यांनी फिर्याद दिली की दि.१८/९/२०२३ रोजी रात्री खामुंडी येथील सेंन्ट्रीग चे काम आवरून तेथील पत्रा शेड मध्ये झोपलो असता  रात्रीच्या वेळी कोणी तरी अज्ञात चोरट्याने त्यांचे आणि त्यांच्या इतर तीन मित्रांचे मोबाईल चोरून नेले आहेत  सदर फिर्यादी वरून गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमी दारामार्फत तपास सुरू केला. आज दि. ३/१०/२०२३ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की खोडद येथील इसम नामे अर्जुन माळी हा त्याच्याकडील दोन तीन मोबाईल घेऊन  विक्रीसाठी नारायणगाव टोमॅटो मार्केट येथे येणार आहे.मिळालेल्या बातमी वरून नारायणगाव येथे सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव *अर्जुन बाळू माळी वय १९,रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे* असे सांगितले.त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यात विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन मिळून आले सदर मोबाईल बाबत चौकशी केली असता हे मोबाईल त्याने त्याचे इतर दोन साथीदारांसोबत ओतूर येथून चोरल्याचे कबुल केले  आहे सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तापासकामी ओतूर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अंकित गोयल सो. अप्पर पोलिस अधिक्षक श्री. मितेश घट्टे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठपो.नि. श्री अविनाश शिळीमकर पो.स.ई. अभिजित सावंत पो.हवा. दिपक साबळे.पो.हवा. राजु मोमीन. पो.हवा. अतुल ढेरे.पो.हवा. विक्रम तापकीर. पो.ना. संदिप वारे.पो.कॉ. अक्षय नवले पो.कॉ. निलेश सुपेकर यांनी केलेली आहे.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!