चाळकवाडीत एकतीसावा शिवांजली साहित्य महोत्सव उत्साहाने साजरा

सोमवारी ( दि २७) सकाळी ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर या साहित्य महोत्सवाचे उदघाटन एकोननव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष डाॅ श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते व क्रुषीभूषण अनंत भोयर अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डाॅ महेश खरात प्रा.मा.रा.लामखडे शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक व स्वागतप्रमुख शिवाजीराव चाळक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी शिवांजली साहित्यपीठाच्या वतीने विविध साहित्यिकांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानंतर डाॅ गुंफा कोकाटे यांनी नात्याचे गुंफन हा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाचे सुत्रसंवादन आदिती चाळक यांनी केले त्यानंतर प्रख्यात चित्रकार दत्ता पाडेकर यांची प्रा.जयसिंग वाडेकर व प्रा डाॅ केशव बोरकर यांनी मुलाखत घेतली त्यानंतर ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संत साहित्यामधील विचार व सद्यस्थिती या विषयावर वैज्ञानिक सुधीर फाकटकर ओमकारमहाराज थोरात डाॅ लता पाडेकर यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे सुत्रसंवादन माधव लांडगे यांनी केले त्यानंतर प्रा.रूपाली अवचरे यांच्या अध्यक्षतेखाली वाचनाने मला काय दिले या चर्चासत्रात शरद लेंडे वल्लभ शेळके महादेव वाघ बाळासाहेब काकडे यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे सुत्रसंवादन दिपक सोनवणे व राजेंद्र धावटे यांनी केले त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात शशिकांत हिंगोणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निमंत्रित कवींच्या कवी संम्मेलनात पुणे नागपूर अकोला अहमदनगर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर चंद्रपूर सातारा अमरावती नांदेड लातूर आदी जिल्ह्यातील पस्तीसहून अधिक कवींनी आपल्या कविता सादर करत काव्यरसिकांची दाद मिळविली

मंगळवारी ( दि २७) सकाळी प्रा.जयसिंग गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व नंदकुमार पाडेकर संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या कवीसंम्मेलनात प्रा.मिरा पाडेकर शंकर हदीमनी यांच्या प्रमुख उपस्थितीत शंभरहून अधिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या त्यानंतर राजेश वैरागडे यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक कार्यकर्ते टी आर वामन यांच्या उपस्थितीत इंटरनेट लक्ष्मणरेषा या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले या चर्चासत्रात प्रशांत शेटे विजय वावगे यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सुत्रसंवादन संतोष जेडगुले यांनी केले त्यानंतर मिना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या गझल मैफल या कार्यक्रमात मंगल लेंडे सुनिता घुले रूपाली कर्डीले कविता काळे रेवती साळूंके महेमुदा शेख यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सुत्रसंवादन सरीता कलढोणे यांनी केले त्यानंतर प्रा.मा.रा.लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उजेडाचे वाटसरू या कार्यक्रमात प्रा.वैशाली सावंत प्रा किर्ती काळमेघ शरद मनसुख ह्रुदयमानव अशोक आदित्य चाळक यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे सुत्रसंवादन प्रा डाॅ केशव बोरकर यांनी केले या कार्यक्रमादरम्यान विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी भेटी दिल्या या कार्यक्रमाची सांगता गाठीभेटी व आभाराच्या कार्यक्रमाने झाली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप वाघोले व बाबासाहेब जाधव यांनी केले तर आभार शिवाजीराव चाळक यांनी मानले





