ताज्या घडामोडी

मराठा समाजाला टिकेल असेच आरक्षण देणार – अजितदादा पवार

पिंपळवंडी -( दि २५) प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आपली भूमिका आहे मागील काळात दोन वेळा आरक्षण मिळाले परंतु ते कायद्याच्या आधारे टिकले नाही कायमस्वरूपी टिकेल असेच आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले

पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथे आयोजित करण्यात आलेल्या  शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रम प्रसंगी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार अतुल बेनके माजी खासदार शिवाजीराव आढाळराव माजी आमदार शरद सोनवणे  पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे सभापती संजय काळे विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर पांडुरंग पवार शरद लेंडे बाळासाहेब काकडे  उद्योजक किशोर दांगट महादेव वाघ माजी आमदार पोपटराव गावडे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर रघुनाथ लेंडे गणपतराव फुलवडे मंगेश काकडे   जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप संजय पानसरे गणेश कवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही परंतु व्हिडिओ क्लिपा व्हायरल करून आपली बदनामी केली जात असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की सर्वच पक्षाचे मुख्यमंत्री झाले मात्र राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला संधी मिळूनही मुख्यमंत्री पद मिळाले नाही राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाने शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केलेली चालते मग आम्ही सर्वांनी एकत्र येऊन भाजप बरोबर गेलो तर बिघडले कुठे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला  सत्तेबाहेर राहिल्यामुळे कामे होत नाही निधी मिळत नाही जुन्नर तालुक्यातील बावीस गावांना पाणीपुरवठा करणारी शंभर कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपुजन आज झाले हे काम सत्ताधारी पक्षात असल्यामुळे झाले सत्तेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळतो त्यामुळे राज्यात  मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले बांगलादेशात द्राक्षांची निर्यात केली जाते मात्र त्यावर एकशे सहा रुपये आयातशुल्क बांगलादेश सरकारने लावले आहे बांगला देशात द्राक्ष पाठविणा-या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले शेती फायदेशीर करायची असेल तर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे

अंगणवाडी सेविकांच्या समस्यांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अंगणावाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ केली त्यानंतर दिपावलीला भाऊबिज दिली आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकार पेन्शन सुरु करण्याबाबत विचार करत असल्याचेही पवार यांनी सांगितले

यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की राज्याचे नेत्रुत्व करण्यासाठी अजितदादा पवार हे सक्षम असून त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली

यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अजितदादा पवार यांनी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे यापुढील काळातही हा निधी मिळणार असल्याचे सांगितले

————————————————————————-

 – नसबंदी केली आणि सरकार पडले

जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यावर उपायोजना करण्यात यावी याबाबतचे नियोजन करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अजितदादा पवार यांना देण्यात आले त्यावर बोलताना ते म्हणाले की तालुक्यात पिंजऱ्यांची संख्या वाढवू सन १९७५ मध्ये सरकारने माणसांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळचे सरकार पडले असे सांगत असतानाच उपस्थितीतांमधुन एकच हशा पिकला

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!