जुन्नरला राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन -न्यायाधीश एस. बी.शेलार यांची माहिती

ओतूर- (कैलास बोडके) :राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जुन्नर येथील जिल्हा व सत्र न्यायालयालयात दि.१४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सत्र न्यायालय जुन्नरचे जिल्हा न्यायाधीश एस बी शेलार यांनी दिली आहे.
जिल्हा न्यायालय व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये दि. १४ मार्चला जुन्नर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांनी प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर आणि सामंजस्याने निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे, विज व पाणी बिल देयके, बँक कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावे, कौटुंबिक वाद, मालमत्ता विवाद, कर्मचारी नुकसान भरपाई प्रकरणे व इतर दिवाणी व फौजदारी तडजोड योग्य प्रकरणे या राष्ट्रीय लोकन्यायालयात निकाली काढले जातात. लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली निघाल्यामुळे दोन्ही पक्षांचा विजय होतो. झालेल्या निर्णयानुसार न्यायालयीन फिस पक्षकाराला परत मिळते. पक्षकारांच्या वेळेची बचत, कमी खर्च व त्वरित न्याय मिळतो. ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे या लोकअदालतीत ठेवायची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयाशी किंवा जुन्नर तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



