चाळकवाडीत गुरुवारपासून दोन दिवसीय बालकुमार साहित्य संम्मेलन
.
पिंपळवंडी – ( दि २२) महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्क्रुती मंडळ मुंबई पुरस्क्रुत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शिवांजली साहित्यपीठ व शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठाण यांच्यावतीने बालकवी ग.ह.पाटील साहित्यनगरी चाळकवाडी येथे गुरुवार ( दि २३) पासून मराठी बालकुमार साहित्य संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संदीप वाघोले यांनी पत्रकार परिषदेत दिली
दोन दिवसीय बालकुमार साहित्य संम्मेलनाचे उदघाटन गुरूवारी ( दि २३) संम्मेलनाचे उदघाटन जेष्ठ बालसाहित्यीक सूर्यकांत सराफ यांच्या अध्यक्षतेखाली आमदार शरद सोनवणे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार अतुल बेनके बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी कार्यवाहक राधिका लोखंडे कोषाध्यक्ष संजय ऐलवाड संयोजक व शिवांजली साहित्य पीठाचे संस्थापक शिवाजीराव चाळक शरदराव लेंडे गटशिक्षण अधिकारी आणिता शिंदे सरपंच मेघाताई काकडे बाळासाहेब काकडे महादेव वाघ राजेंद्र पायमोडे गजानन चाळक कोंडीभाऊ वामन तुळशीराम नरवडे प्रदीप वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे शुक्रवारी ( दि २४) खासदार डाॅ अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते व क्रुषीरत्न आणिलतात्या मेहेर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आशाताई बुचके यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर सम्मेलन ध्वजारोहन कार्यक्रम होणार आहे
प्रथम सत्रात कैलास दौंड यांच्या अध्यक्षतेखाली बालसाहित्याची सद्य परीस्थीती या विषयावर परिसवाद होणार असून या परिसवादात श्रीकांत पाटील आणिल कुलकर्णी व जालिंदर डोंगरे सहभाग घेणार आहेत दुस-या सत्रात सूर्यकांत सराफ व एकनाथ आव्हाड यांच्या उपस्थितीत मनोरंजनामधुन बालसाहित्य कार्यक्रम होणार आहे तिस-या सत्रात भास्कर बडे व अलका सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली शालेय विद्यार्थ्यांचे कवीसंम्मेलन होणार असून यामध्ये सोनाली खामकर यश शिंदे गौरी बगाड आदित्य कातोरे उत्कर्षा लांडगे काव्या जाधव शिवम गाडेकर शिवांक भोर प्रज्ञा पाडेकर तितिक्षा गायकवाड श्रेया अभंग रोहिदास तळपे आराध्या नागरगोजे या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे चौथ्या सत्रात डाॅ विनोद सिनकर यांच्या अध्यक्षतेखाली कथापंचक या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांचे कथावाचन होणार असून यामध्ये रूद्र अभंग अक्षदा सोनवणे अनुष्का भालचिम सार्थक देठे आर्या पाडेकर हे विद्यार्थी सहभाग घेणार आहेत पाचव्या सत्रात रमेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संजय ऐलवाड बाळक्रुष्ण बाचल व उत्तम सदाकाळ यांचा कथाकथन हा कार्यक्रम होणार आहे सहाव्या सत्रात या डाॅ विद्या सुर्वे -बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली व विनोद कुलकर्णी श्रीपाद अपाराजीत वल्लभ शेळके अंकुश सोनवणे अनंतराव चौगुले विजय गुंजाळ वैभव तांबे सुनिल ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बालकुमार साहित्य संम्मेलनाचा समारोप होणार आहे



