ताज्या घडामोडी

सरकटे,हाडवळे काकडे व चाळक यांचा यशवंत पुरस्काराने सन्मान


 

पिंपळवंडी -( दि. 27 ) प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पिंपळवंडी येथील यशवंत सहकारी पतसंस्थेच्या वतीने ह.भ.प.तुळशीराम महाराज सरकटे बबनराव हाडवळे प्रा.द.स.काकडे व शिवाजीराव चाळक यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते यशवंत परस्कार देऊन सन्मान करण्यात आला
यशवंत सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना एक्कावन्न हजार रुपये रोख सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन यशवंत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ह.भ.प.तुळशीराम महाराज सरकटे सामाजिक कार्यकर्ते बबनराव हाडवळे साहित्य क्षेत्रातील जेष्ठ ग्रामीण कथा व कादंबरीकार प्रा.द.स.काकडे व शिवांजली साहित्य मोहत्सवाच्या माध्यमातून साहित्य चळवळीला मूर्त स्वरूप देणारे जेष्ठ कवी शिवाजीराव चाळक यांना राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार सहकारमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खासदार शिवाजीराव आढाळराव माजी आमदार शरददादा सोनवणे विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे बाजार समितीचे सभापती संजय काळे विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार विघ्नहरचे संचालक बाळासाहेब काकडे  संजयराव पानसरे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष भगवानराव पासलकर उद्योजक किशोर दांगट जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेवशेठ वाघ  गणपतराव फुलवडे   बाजार समितीचे माजी उपसभापती रघुनाथ लेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेवशेठ वाघ यांनी केले तर सुत्रसंचालन लक्ष्मण मंडलीक व सबाजीआण्णा लेंडे यांनी केले व आभार महादेवशेठ वाघ यांनी मानले
Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!