ताज्या घडामोडी

पिंपळवंडी येथे कुकडी डाव्या कालव्यात पडलेल्या तरूणाला वाचविण्यात यश 

पिंपळवंडी -( दि ४) प्रतिनिधी

पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथे येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पडलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाला चाळकवाडी येथील दोघाजणांनी सतर्कता दाखवत त्याला वाचविण्यात यश आले ही घटना रविवारी ( दि ३) पहाटे तिन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली

याबाबत मिळालेली माहिती अशी की पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले कार्तिक  दोन तरुण  सुट्टी असल्यामुळे मोटारसायकलवरुन पुण्याहून शिर्डीला जात असताना ते दोघेजण लघुशंका करण्यासाठी पिंपळवंडी येथील  कुकडी कालव्याच्या बाजूला गेले त्याचवेळी यामधील एका तरूणचा  पाय घसरून तो कुकडी डाव्या कालव्यात पडला पाण्यात प्रवाह जोरात असल्यामुळे तो दूर अंतरापर्यत वाहून गेला त्यानंतर त्याने कालव्यात असलेल्या एका लोखंडी खांबाला धरून ठेवले त्यावेळी त्याचा दुसरा मित्र  मदतीसाठी आरडाओरडा करत होता परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे त्यास मदत मिळणे अवघड झाले त्याच वेळी चाळकवाडी येथील शिवव्यख्याते आदित्य चाळक व हाॅटेल व्यवसायिक झिंजाड हे दोघेजण पुण्याहून येत होते त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून चाळकवाडी येथील काही तरूणांन फोन लावला त्याच क्षणाला चाळकवाडी येथील तरुण त्या ठिकाणी जमा झाले आदित्य चाळक व हरीशेठ  झिंजाड  यांनी या  सर्वांच्या मदतीने त्यास सुखरुप पाण्याच्या बाहेर काढले या  तरूणाला  वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आदित्य चाळक व झिंजाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!