ताज्या घडामोडी
शरददादा सोनवणे यांच्या उपोषणास वाढता पाठिंबा : पाठिंब्यासाठी पिंपळवंडी ग्रामस्थांची मोटारसायकल रॅली

पिंपळवंडी ( दि २७) प्रतिनिधी
जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांचे शुक्रवार ( दि २४) पासून विविध मागण्यांसाठी आळेफाटा येथे उपोषण सुरु असून या उपोषणास सर्वच स्तरामधुन पाठिंबा मिळत आहे या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पिंपळवंडी ग्रामस्थांनी चाळकवाडी ते आळेफाटा मोटारसायकल रॅली काढून पाठिंबा दिला आहे

पिंपळवंडी काळवाडी व. पिंपरीपेंढार येथे लागोपाठ बिबट्याच्या हल्ल्याच्या तिन घटना घडल्या होत्या त्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते पिंपरीपेंढार येथे वनखात्याच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घातला होता या दरम्यान झालेल्या झटापटीत वनखात्याच्या एका महिला अधिकारीचा गळा दाबन्यात आला होता या प्रकरणी नऊजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वनखात्याने नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांचे निलंबन करण्यात यावे पकडलेले बिबटे अभयारण्यात सोडण्यात यावे बिबट सफारी संदर्भात करण्यात आलेल्या पत्रव्यवहारासंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी अशा अनेक मागण्यांसाठी माजी आमदार शरद सोनवणे हे शुक्रवार पासून आळेफाटा या ठिकाणी उपोषणास बसले आहेत
या उपोषणास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे या उपोषणादरम्यान माजी राज्यमंत्री बाळासाहेब थोरात माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील माजी आमदार बाळासाहेब दांगट भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आमदार अतुल बेनके विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर संचालक विवेक काकडे तबाजी शिंदे शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे राजश्री बोरकर आशाताई बुचके यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दिला आहे तसेच घनगर बांधवांनी मेंढ्या व बक-यांसह उपस्थिती दाखवून पाठिंबा दिला आहे तर आता प्रत्येक गावागावामधुन पाठिंबा मिळत आहे सोनवणे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पिंपळवंडी ग्रामस्थांनी संघटित होऊन चाळकवाडी ते पिंपळवंडी अशी भव्य मोटारसायकल रॅली काढून उपोषणास पाठिंबा दिला आहे या रॅलीत पिंपळवंडी गावच्या सरपंच मेघा काकडे उपसरपंच मयूर पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता





