ताज्या घडामोडी

चाळकवाडी येथे मराठीभाषा दिनानिमित्त रविवार पासून तिन दिवसीय शिवांजली मराठी  साहित्य मोहत्सव

पिंपळवंडी -( दि २४) शिवांजली साहित्य पीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद चाळकवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवारी ( दि २५) पासून तिन दिवसीय शिवांजली मराठी साहित्य मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक व स्वागत प्रमुख शिवाजीराव चाळक यांनी दिली

गेल्या तीस वर्षांपासून चाळकवाडी येथे मराठी भाषा दिनामित्त या शिवांजली मराठी साहित्य मोहत्सवाचे आयोजन करण्यात येत असून सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवारी ( दि २५) सकाळी चाळकवाडी -नाणेघाट – चाळकवाडी या मराठी भाषा दिंडीचे आयोजन करण्यात आले असून या मराठी भाषा दिंडीचे उदघाटन जुन्नरचे माजी आमदार व किल्ले शिवनेरीचे शिलेदार शरददादा सोनवणे यांच्या शुभहस्ते व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत  होणार आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजता नाणेघाट येथील शिलालेखाचे पुजन जितेंद्र गुंजाळ डाॅ संजय बोरुडे डाॅ स्वप्निल घाडगे राजकुमार डोंगरे विजय लोंढे व उज्वलाताई शेवाळे यांच्या शुभहस्ते होणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा ते आठ या वेळेत शेकोटी कविसंम्मेलन होणार आहे सोमवारी ( दि २६) सकाळी दहा वाजता ८९ व्या मराठी साहित्य संम्मेलमाचे अध्यक्ष डाॅ श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते डाॅ पुरूषोत्तम काळे प्रा.डाॅ. संदीप सांगळे अनंता भोयर प्रा.डाॅ महेश खरात अंजली कुलकर्णी श्रीकांत ढेरंगे मारोतराव डोंगरे त्यानंतर डाॅ गुंफा कोकाटे यांचा नात्याची गुंफन हा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर चित्रकार दत्ता पाडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संत साहित्यातील विचार व सद्यस्थिती या विषयावर सुधीर फाकटकर ओमकारमहाराज थोरात डाॅ लता पाडेकर व अनंत भोयर हे आपले विचार मांडणार आहेत त्यानंतर रूपाली अवचरे यांच्या अध्यक्षतेखाली वाचनाने मला काय दिले या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून या चर्चासत्रात शरदराव लेंडे जगन्नाथ कवडे महादेव वाघ वल्लभ शेळके बाळासाहेब काकडे योगेश आमले इंद्रजीत पाटोळे सहभागी होणार आहेत सायंकाळी पाच वाजता अंजली कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व शशिकांत हिंगोणेकर प्रदीप गांधलीकर विजय शेंडगे वेणूप्रशांत प्रशांत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  निमंत्रित कवींचे कवीसंम्मेलन होणार आहे मंगळवारी ( दि २७) प्रा डाॅ जयसिंग गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व नंदकुमार पाडेकर मिरा हाडवळे व शंकर हदीमनी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसरे निमंत्रित कवींचे कवीसंम्मेलन होणार आहे त्यानंतर राजेश वैरागडे यांच्या अध्यक्षतेखाली व तानाजी वामन यांच्या प्रमुख उपस्थितीत  इंटरनेट लक्ष्मणरेषा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परीसंवादामध्ये जालिंदरमामा डोंगरे प्रशांत शेटे विजय वावगे किशोर हांडे हे सहभागी होणार आहेत त्यानंतर मिना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गझल मैफल होणार असून मैफल होणार असून यामध्ये मंगल लेंडे सुनिता घुले रूपाली कर्डीले कविता काळे रेवती साळूंके मेहमुदा शेख या सहभागी होणार आहेत त्यानंतर उजेडातील वाटसरू या कार्यक्रमात  प्रा.मा.रा.लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा.वैशाली सावंत प्रा.डाॅ किर्ती काळमेघ प्रा.शरद मनसुख ह्रुदयमानव आदित्य चाळक शांताराम डफळ व भास्करराव घुले यांची विविध विषयांवर व्यख्याने होणार आहेत तर गाठीभेटी व आभार या कार्यक्रमाने या साहित्य संम्मेलनाची सांगता होणार आहे

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!