वडगावआनंदच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुले झाली बालविक्रेते

वडगाव आंनद (प्रतिनिधी) डी बी वाळुंज यांच्या संकल्पनेतून सन 2010 या सालापासून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व समाजात एकरूप होऊन असणाऱ्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी गेली अनेक वर्ष वडगाव आनंद ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या शेतीतील मालाचा विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांकडून बनवून घेतलेल्या खाद्यपदार्थांचा तसेच इतरही वस्तूंचा बाजार आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत भरविला जात आहे. त्याचाच एक भाग आणि शनिवार फनीवार या सर्वांचा मेळ घालत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक त्याचप्रमाणे पालक आणि विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचं आयोजन नियोजन केलं होतं आणि ते गावकऱ्यांच्या त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे अधिकच्या आनंदाच्या वातावरणात मेळावा पार पडला, मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी रोख पैशाचे देवाणघेवाण करण्याऐवजी बँकेच्या स्कॅनरला महत्त्व देत मार्केटमध्ये असणाऱ्या सुट्ट्या पैशांच्या टंचाईवर मात करत अधिकच व्यवहारांना प्राप्त कसे करता येईल याकडे लक्ष देत सर्व शिक्षकांच्या निगराणी मध्ये खऱ्या अर्थाने आठवडा बाजार म्हटलं तरी वावगे होणार नाही अशा स्वरूपाचं स्वरूप या आयोजित कार्यक्रमाला आल्यामुळे गावातील आठवडे बाजार भरला की काय असे अनेक ग्रामस्थांना या ठिकाणी वाटले आणि त्यांनी ते त्यावेळी बोलवून देखील दाखविले. या बालआनंदी बाजार या उपक्रमाचे गावातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून स्वागत व हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
मुलांना व्यवहारज्ञान समजावे , वस्तूची विक्री कशी करावी , पैसे मिळवताना आपले आईवडील किती कष्ट करतात, याची जाणीव व्हावी, या गुणांचा परिपोष व्हावा यासाठी शाळेने केलेला हा आगळावेगळा उपक्रम होय.
मुलांनी बाजारात स्वतःच्या शेतात पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी आणला होता . मुलांजवळचा स्वच्छ व ताजा भाजीपाला पाहून ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फिटत होते . त्याबरोबरच खाऊगल्लीलाही मुलांनी व नागरिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला .सर्व प्रकारची भेळ , चहा , पोहे वडापाव , चटपट छोले , खमंग पाणीपुरी , कस्टर्ड , व्हाईट चॉकलेट , मिल्क शेक इ खाद्यप्रकारांनी खाऊ गल्ली
सजून गेली होती .
बाल आनंदी बाजारात पालक ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने मुलांकडून खरेदी करत होते . मुलांशी घासाघीस करत होते . मुलेही सुट्टे पैसे नेमके देत होती . शाळेतल्या मिळालेल्या ज्ञानाचा व जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांचे पाढे 30 पर्यंत तोंड पाठ असल्यामुळे व्यवहारात त्याचा उपयोग पाहताना उचंबळून येत होते . या बालआनंद बाजारात मागील वर्षीच्या बाजाराचे रेकॉर्ड तोडत यावरही 45 हजार रुपयांहून अधिकची आर्थिक उलाढाल झाली .
या बाल आनंदी बाजाराला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दत्तात्रय गंगाधर चौगुले (पोलीस पाटील ), श्री डी .बी . (नाना ) वाळुंज सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षण तज्ञ सदस्य, ज्येष्ठ नागरिक श्री हरिनाना देवकर , ग्रामपंचायत उपसरपंच श्री गणेश भुजबळ माजी उपसरपंच श्री ऋषीभाऊ गडगे सदस्य संदीप गडगे श्री संतोष पादीर , विविध कार्यकारी सोसायटी संचालक श्री निमेश वाळुंज, ग्रामपंचायत ज्येष्ठ लिपिक श्री तुकाराम वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश गडगे, श्री संदेश काशीकेदार, श्री सचिन देवकर, श्री कैलास वाळुंज , श्री बारकुशेठ गडगे , श्री नवनाथ वाळुंज सदस्य सौ निशा वाळुंज इत्यादी मान्यवरांनी भेट दिली व मुलांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले .
बालआनंद बाजाराचे नियोजन करताना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दत्तात्रय चौगुले पाटील, सदस्य श्री डीबी (नाना ) वाळुंज, मुख्याध्यापक श्री सुनील ठिकेकर तसेच सहशिक्षिका सौ छाया डुंबरे सौ सुनंदा तांबे सौ सविता खेत्री सौ गीतांजली बोऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे बाजाराची वेळ संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्या परिसरात बाजार भरण्यात आला होता त्या परिसराची जागा साफसफाई करून सर्व परिसर स्वच्छ व पहिल्यासारखा केला याचे देखील ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले.



