ताज्या घडामोडी

समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये यश

 

बेल्हे -( दि ३) प्रतिनिधी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तालुका क्रीडा व शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर या ठिकाणी नुकतीच पार पडली.
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे व समर्थ गुरुकुल बेल्हे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत घवघवीत यश मिळवण्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर व प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे या विद्यालयातील प्रतीक जगदाळे याने लांब उडी या क्रीडाप्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
भालाफेक या क्रीडाप्रकारामध्ये सौरभ बबन चासकर याने प्रथम क्रमांक मिळविला.
उंच उडी या क्रीडा प्रकारांमध्ये तेजस बारेकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
थाळीफेक या क्रीडाप्रकारामध्ये चैतन्य नेहरकर याने तृतीय क्रमांक मिळविला.
तनुजा भाईक,मुक्ता डुकरे,विद्या गुंजाळ,तन्वी शिंदे यांनी ४ x ४०० रिले मध्ये द्वितीय क्रमांक क्रमांक मिळविला तर स्वाती शिंदे,मुक्ता डुकरे,विद्या गुंजाळ,तन्वी शिंदे यांनी १९ वर्षे वयोगटामध्ये १ x १०० रिले या क्रीडा प्रकारामध्ये तृतीय क्रमांक संपादन केला.
समर्थ गुरुकुल, बेल्हे या सीबीएससी मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी १४ व १७ वयोगटामध्ये सोहम शिंदे याने २०० मी धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर संस्कृती देशमाने हिने २०० मीटर धावणे या क्रीडाप्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
श्रीवैष्णोकार्तिकी किठे,चैत्राली काने,श्रुष्टी भांबेरे,चैत्राली गुंजाळ,साक्षी आहेर या मुलींच्या संघाने १४ वर्षाखालील मुली या वयोगटामध्ये ४×१०० मीटर रिले या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
१७ वर्षाखालील मुली या वयोगटामध्ये ४×४०० मीटर रिले या क्रीडा प्रकारामध्ये तनिष्का गाडगे,संस्कृती देशमाने,श्वेता मटाले,अदिती गोरडे,दिक्षा गाडगे या मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
१४ वर्षाखालील मुले लांब उडी मध्ये श्लोक सुरेश गलांडे याने तृतीय क्रमांक पटकावला.
४×१०० मी रिले या क्रीडा प्रकारात अद्वैत शिंदे,श्लोक गलांडे,सोहम शिंदे,वेदांत चिकने,संस्कार भांबेरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे व किरण वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची बालेवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती क्रीडा संचालक एच पी नरसूडे यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके,क्रीडा संचालक एच पी नरसुडे ,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली आहेर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!