तपपूर्ती वर्षानिमित्त निमित्त श्री पिंपळेश्वर कावड सोहळ्याचे चौदानंबर येथे स्वागत

:
पिंपळवंडी -( दि. 11) श्री क्षेत्र पिंपळवंडी ते श्री क्षेत्र भीमाशंकर या कावड सोहळ्याचे चौदानंबर येथील श्री स्वामी व्यापारी बचत गटाच्या वतीने स्वागत करण्यात आले
येथील श्री स्वामी व्यापारी बचत गटाच्या वतीने गेल्या बावीस वर्षांपासून आळंदी व धार्मिक ठिकाणीजाणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान व इतर सुविधा पुलविल्या जातात सालाबाद प्रमाणे गेल्या अकरा वर्षांपासून पिंपळवंडी येथिल पिंपळेश्वर सेवा समितीच्या वतीने सुरु असलेल्या कावड सोहळ्याचे शनिवारी ( दि. 10) चौदानंबर या ठिकाणी आगमन झाले या कावड सोहळ्याचे हे तपपूर्ती वर्ष असल्यामुळे या ठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात आले यावेळी कावड पूजन करण्यात आले

तसेच यावेळी कावड सोहळ्यातील भाविक व उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे उप तालुका प्रमुख मंगेश आणा काकडे सरपंच मेघाताई काकडे ग्रामपंचायत सदस्य सतीश काकडे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश भोर सामाजिक कार्यकर्ते पि के कोकाटे तंटामुक्ती मा अध्यक्ष तानाजी शेठ वाळुंज प्रकाशशेठ नेहरकर मा चेअरमन संतोषशेठ नेहरकर मा सदस्य सत्यवान काकडे कावड समिती अध्यक्ष वंसत वाघ विकास काकडे राजु काकडे सुनील फुलसुंदर आदी मान्यवर उपस्थित होते ह भ प रामदास महाराज मोरे भागुशेठ भोर संतोष मुळे मारुती टाकळकर पोपट बो-हाडे जगदीश पंडित अनिल टेंभेकर विठ्ठल वाळुंज सर्वांचे बाबाजी टाकळकर अनेक मान्यवर उपस्थित सोहळा संपन्न झाला



