चैतन्यवारी सदगुरु पालखी सोहळ्याचे रविवारी प्रस्थान

पिंपळवंडी (प्रतिनिधी) : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांची संजीवन समाधी श्री क्षेत्र ओतूर येथे आहे. माघ शुद्ध दशमी ला झालेल्या अनुग्रह दिनाचे औचित्य साधून संपन्न होणाऱ्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान रविवारी(दि.२५) सकाळी सात वाजता होणार असून वाघजाई नगर, शिरोली, पेठ, मंचर, नारायणगाव, ओझर मार्गे ओतूर ला बुधवार(दि.२८) रोजी दुपारी १२ वाजता चैतन्य समाधी जवळ समारोप होईल.
चिदंबर स्वरूप पपु. उमाकांत कुलकर्णी यांचे प्रेरणेने सुरु झालेला पालखी सोहळा सद्गुरु ताईच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या शिव चिदंबर सेवा समिती आयोजित पालखी सोहळ्याचे हे तेरावे वर्षे असून सोहळ्याचे वीणापुजन तुकोबा रायांचे वंशज व मा. अध्यक्ष ह.भ.प रामदास महाराज मोरे, ह.भ.प माणिक महाराज मोरे व पादुका पुजन देहू संस्थान चे अध्यक्ष व विश्वस्त
पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या शुभहस्ते होणार असून वाटचालीमध्ये ह.भ.प नितीन महाराज काकडे, ह.भ.प संतोष महाराज बढेकर, ह.भ.प प्रसाद महाराज वाबळे, यांची पालखी तळ मुक्कामी किर्तन होणार आहे. समारोप प्रसंगी हभप. भरत महाराज थोरात यांचे समारोप किर्तन होणार आहे. ना.गाव मार्केट कमिटी मध्ये भव्य रिंगण सोहळा संपन्न होईल. बहुसंख्येने वारकरी बांधवांनी सदर पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष ह.भ.प रामदास महाराज मोरे व चिदंबर सेवा समिती वतीने करण्यात येत आहे.



